जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 81 रुग्ण आढळले आहेत. यात वणी शहरातील 23 रुग्ण तर ग्रामीण भागात 54 रुग्ण आहेत. यात 20 रुग्ण एकट्या निळापूर येथील आहे. याशिवाय मारेगाव तालुक्यातील 2 व्यक्ती आणि भद्रावती व झरी तालुक्यातील प्रत्येकी 1 व्यक्ती वणीत पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान आज यवतमाळ येथे उपचारादरम्यान वणी तालुक्यातील 3 व्यक्तींचा मृत्यू झाला. यात एका 28 वर्षीय तरुणाचा, 60 वर्षीय पुरुषाचा तसेच एका 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे. याशिवाय मारेगाव येथील एका 78 वर्षीय वृद्धाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज आरोग्य विभागातर्फे 554 जणांची रॅपिड ऍन्टीजन टेस्ट केली. ही आरोग्य विभागाची एक स्तुत्य कामगिरी आहे. अधिकाधिक संशयीतांची टेस्ट होत असल्याने परिसरात कोरोनाचे संक्रमण वाढण्यास काही प्रमाणात आळा बसत आहे. आज 7 कोरोनामुक्त रुग्णांमा सुटी देण्यात आली आहे. आज वणी ट्रामा केअर युनिट मध्ये आमदार निधीतून 50 खाटांचे कोविड केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. याबाबत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी माहिती दिली आहे.
आज वणी शहरात रविनगर येथे 4 रुग्ण तर कनकवाडी येथे 3 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय देशमुखवाडी, प्रगतीनगर, रंगारीपुरा, शास्त्रीनगर, आंबेडकर चौक, भगतसिंग चौक, विठ्ठलवाडी, विद्यानगरी, काजीपुरा, गाडगेबाबा चौक, अणे चौक, तेली फैल, सीसीसी वणी, रामपुरा वार्ड, मनिषनगर व गुरुनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण असे एकूण 23 रुग्ण आढळून आले आहे.
ग्रामीण भागात आलेल्या 54 रुग्णांमध्ये निळापूर येथे 20 रुग्ण, हनुमान नगर येथे 9 रुग्ण तर शिंदोला येथे 8 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय चिखलगाव व येणक येथे प्रत्येकी 4 रुग्ण तर दहेगाव, शिरपूर, नांदेपेरा, कुर्ली, कैलासनगर, उकणी, विरकुंड, छोरीया ले आउट, गोवारी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर मारेगाव येथील 2 व्यक्ती व भद्रावती आणि झरी तालुक्यातील प्रत्येकी 1 व्यक्ती वणी येथे पॉझिटिव्ह आले आहेत.
आज यवतमाळ येथून एकही अहवाल प्राप्त झाला नाही. आज 554 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 81 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 79 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 1009 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात 461 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 25 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 384 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 52 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 2351 रुग्ण आढळून आलेत. यातील 1851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 39 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
आरोग्य विभागाचा अधिकाधिक टेस्ट करण्यावर भर
गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्य विभागाने अधिकाधिक टेस्ट करण्यावर भर दिला आहे. आज तर 554 संशयीतांच्या टेस्ट करण्यात आल्यात. हा तालुक्यातील एक रेकॉर्डच आहे. अधिकाधिक टेस्ट केल्यामुळे आधीच कोरोना आहे किंवा नाही याची माहिती मिळत आहे. अधिकाधिक टेस्ट करत असल्याने असल्याने कोरोना रुग्णांची संख्या जरी वाढताना दिसत असली तरी यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्यास काही प्रमाणात आळा बसत आहे. डब्यूएचओने देखील अधिकाधिक टेस्ट करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला होता.
आमदार निधीतून 50 खाटांचे कोविड केंद्र सुरू करण्यास मान्यता
वणी तालुक्याची आवश्यकता लक्षात घेता वणी येथे ट्रामा केयर यूनिट ईमारतीत 50 खाटाचे ऑक्सीजन युक्त सुविधेसह कोविड केंद्र कार्यान्वीत करण्यात यावे. यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पुढाकार घेत आपल्या स्थानिक आमदार निधीतून 50 लाख रुपये मंजूर करून तो तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते. त्या पत्राची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन वणी येथे कोविड केंद्र त्वरीत कार्यान्वीत करण्यात येत आहे. असे लेखी पत्र यवतमाळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना दिले आहे. या अत्याधुनिक कोविड उपचार केंद्रात पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा, रेमडीसीवर इंजेक्शन, व्हेंटिलेटर युक्त बेड, स्ट्रेचर, डॉक्टरसह पुरेसे वैद्यकीय कर्मचारी राहणार आहेत. अशी माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली आहे.
हे देखील वाचा: