कोविड सेंटर मध्ये सुविधांचा अभाव:

उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील परसोडा येथील एकमेव कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी दुपारी 4 वाजता उपविभागीय अधिकारी यांना शिवसेना शहरप्रमुख राजू तुराणकार यांनी दिले. तिथे आवश्यक सुविधांची मागणी त्यांनी केली.

तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार होण्याकरिता परसोडा येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी रुग्णांना गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु आवश्यक असलेले पिण्यासाठी गरम पाणी सेंटरमध्ये उपलब्ध नाही. त्यातच जागोजागी कमालीची अस्वच्छता दिसून येते.

कोविड सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या आहाराबाबत अनेक तक्रारी आहेत. या समस्यां सोडविण्याबाबत उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी निवेदन दिले. दोन महिन्यांपूर्वी कोविड सेंटरमध्ये अनेक असुविधा होत्या. सोशल मीडियावर याबाबतचे व्हिडीओसुद्धा टाकण्यात आले होते.

त्यानंतर वणीतील काही सुजाण नागरिक व पक्षनेत्यांनी अशाप्रकारचे निवेदन दिले होते. त्यानंतर असुविधांबाबत कोणतीही तक्रार नव्हती परंतु आता पुन्हा प्रशासन सुस्त झाले आहे. त्याला जागे करण्यासाठी म्हणून निवेदन देत असल्याची माहिती राजू तुराणकर यांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.