जगाचा निरोप घ्यायचा नसेल तर काही दिवस घरातच राहा

तालुका प्रशासनाचे जनतेला आवाहन

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: रविवारी झालेला जनतेचा बंद न भुतो न भविष्यती ठरला. मात्र पाच वाजता नंतर कोरोनाशी लढण्यासाठी जे युध्द जनतेनी पुकारलं होतं त्याचं टाळ्या, थाळ्या वाजवून उन्मादात रुपांतर झालं. रस्त्यावर आलेल्या लोकांना घरी बसण्यासाठी पोलिंसाची तारेवरची कसरत झाली.

हा कर्फ्यू उद्याच्या जगण्यासाठी व कोरोना वायरसला हरविण्यासाठी साठी होता. पण काही अती उत्साही टोळक्यांनी शासनाच्या उद्देशाला तिलांजली देत जणू टाळ्या, थाळ्या वाजवून आनंद व्यक्त केल्याने दिवसभर केलेली तपस्चर्या भंग झाली.

हा कर्फ्यू जगाचा निरोप लवकर घ्यायचा नसेल तर शासन  प्रशासनाचे जे आदेश आहे ते पाळणे प्रत्येक नागरिकांचे काम आहे असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्र शासन दर मिनिटाला कोरोना वायरसला हरविन्यासाठी धाडसी निर्णय घेत असून तालुक्यातील जनतेनी ही बाब अति गांभीर्याने घेऊन नवीन आदेश येत पर्यत घरीच रहावे असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.