नावात काय आहे? सिद्ध करून दाखवलं टाकळीच्या ‘जयश्री’ने

झरी तालुक्यातील शेतकऱ्याची मुलगी फार्मसीच्या परीक्षेत मेरीट

0

सुशील ओझा, झरी: नुकत्याच झालेल्या उन्हाळी परीक्षा २०२० जयश्रीने विजयश्री मिळवली. नावात काय आहे? असं म्हणतात. झरी तालुक्यातल्या टाकळीसारख्या एका छोट्याशा खेड्यातल्या जयश्रीने परीक्षेत घवघवीत यश मिळवले.

आपल्या कुटुंब आणि गावाचे नावलौकिक करणारी ही विद्यार्थीनी आहे, जयश्री मोहन बुरेवार. झरी तालुक्यातील शेतकऱ्याची मुलगी फार्मसी परीक्षेत मेरीट येते. ही बाब तिच्या परिवारासह सर्वांनाच अभिमानास्पद आहे.

जयश्री ही यवतमाळ येथील पी. वाधवणी कॉलेज शिक्षण घेत होती. फार्मसी पदविका उन्हाळी परीक्षेत तिने 90.50 टक्के गुण प्राप्त केलेत. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत तिने प्रावीण्य प्राप्त केले.

झरी तालुका आदिवासी बहुल अतिदुर्गम तालुका आहे. शेतकरी कुटुंबातील जयश्रीची शिकण्याची जिद्द बघून वडील मोहन बुरेवार यांनी खूप कष्ट घेऊन आपल्या मुलीला शिकविण्याकरिता यवतमाळ येथे पाठविले. वडिलांच्या कष्टाची किंमत मुलगी जयश्रीने जाणली.

आपल्या कठोर परिश्रम घेऊन चांगले गुण प्राप्त केले व आपल्या कुटुंबासह गावाचे व तालुक्याचे नाव गाजवले. जयश्री आपल्या यशाचे श्रेय आई, वडील व आपल्या गुरुजनांना देत आहे. तिच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हेदेखील वाचा

‘त्या’ शेतमजुराच्या संग्रहात आहे जवळपास ५० हजार अनमोल ठेवा

हेदेखील वाचा

शाळा सुरू होण्याआधी ‘गुर्जी लोक्स’च पॉजिटिव्ह

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.