शाळा सुरू होण्याआधी ‘गुर्जी लोक्स’च पॉजिटिव्ह

10 शिक्षक पॉजिटिव्ह, तालुक्यात पॉजिटिव्ह शिक्षकांची रुग्णालयात 'शाळा'

1

जब्बार चीनी, वणी: दिनांक 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. त्या दृष्टीने आवश्यक ती मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली असून त्यावर तातडीने पावलं उचलली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शाळा सुरू होण्याआधी सर्व शिक्षकांची कोरोना टेस्ट केली जात आहे. त्यात तालुक्यातील 10 शिक्षक पॉजिटिव्ह आले आहेत. ही  बाब शाळेसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. कोरोनाच्या सावटखाली शाळा सुरू होणार असल्याने त्याला विद्यार्थी आणि पालक किती प्रतिसाद देईल? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार सध्या ऑनलाईन क्लास सूरू आहेत. अखेर कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताच शासनाने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याला परवानगी दिली आहे. सोमवारी दिनांक 23 नोव्हेंबरपासून शासनाने दिलेले मार्गदर्शक तत्वाचे पालन करून वर्ग 9 वी ते 12 पर्यंतची क्लास सुरू होणार आहे. त्यासाठी सर्व शिक्षकांना कोरोनाची टेस्ट करणे अनिवार्य केली आहे.

सध्या परिसरातील शिक्षकांनी कोरोना टेस्ट केली असता त्यात 10 शिक्षक पॉजिजिव्ह आले आहेत. विवेकानंद येथील 4, जनता 2, आदर्श 2 तर स्वर्णलीला शाळेतील 2 शिक्षक पॉजिटिव्ह आले आहेत. पॉजिटिव्ह आलेल्या काही शिक्षकांनी उपचारासाठी बाहेर धाव घेतली आहे. तर इतर शिक्षक आयसोलेट आहेत.

वणीत पॉजिटिव्ह तर नागपूरमध्ये निगेटिव्ह
शहरातील एक शाळेतील शिक्षिका ही वणी येथे पॉजिटिव्ह आली. त्यानंतर त्या शिक्षिकेने खबरदारी म्हणून नागपूर येथे उपचारासाठी धाव घेतली. तिथे त्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यात. तिथे त्यांची टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली. वणीत टेस्ट पॉजिटिव्ह तर नागपूरमध्ये टेस्ट निगेटिव्ह आल्याने गोंधळात अधिक भर पडली आहे.

शिक्षकांमध्ये कोरोनाचे लक्षणं नाहीत…
जे शिक्षक पॉजिटिव्ह आले आहेत. त्या शिक्षकांमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणं आढळून आलेले नाहीत. शाळा सुरू होणार असल्याने शासनाच्या आदेशानुसार त्यांनी कोरोनाची टेस्ट केली असता ते पॉजिटिव्ह आलेत. लक्षणं नसलेले कोरोनाचे रुग्ण हे अधिक धोकादायक मानले जातात. कारण ते जरी फिट दिसत असले तरी ते कोरोनाचा संसर्ग वाढवण्याचे उत्तम वाहक असतात.

आता वर्ग भरणार असल्याने वर्गात लक्षणं नसलेला एखादा विद्यार्थीही असू शकतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच गेल्या काही दिवासांपासून तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे. शाळा सुरू होण्याआधीच ‘गुर्जी लोक्स’ही पॉजिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आता शाळा कशी भरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा…

रेतीची अवैध वाहतूक, 4 ट्रॅक्टरवर मारेगाव पोलिसांची कारवाई 

हे पण वाचा…

चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी दारू पकडली, तरुणांना अटक

1 Comment
  1. […] शाळा सुरू होण्याआधी ‘गुर्जी लोक्स&#821… […]

Leave A Reply

Your email address will not be published.