चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी दारू पकडली, तरुणांना अटक
मुकुटबन पोलिसांची कार्यवाही, दुचाकीसह 61 हजारांचा मुद्देमाल जप्त
सुशील ओझा, झरी: मंगळवारी 17 नोव्हेंबरला मुकुटबन येथील एका देशी दारूच्या दुकानातून दोन तरुण दारूच्या बाटल्या घेऊन चंद्रपूर जिल्यातील कोरपना तालुक्यात घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून ठाणेदार धर्मा सोनुने, जमादार अशोक नैताम, संतोष मडावी, राम गडदे, होमगार्ड प्रकाश चिटलावार आणि वैभव गोरलावार यांनी सापळा रचला.
दुचाकीने दारू घेऊन जाणाऱ्या विश्वास नरेंद्र मालेकर (21) रा. गांधीनगर, कोरपना आणि गणेश उमेश चिंचोळकर (19) रा. तेजापूर यांना रात्री 8 वाजता गावातीलच पोस्ट ऑफिसजवळ पोलिसांनी पकडले.
त्यांच्याकडून दुचाकी पल्सर (MH 34 AE 8840) किंमत 50 हजार रूपये आणि रॉकेट कंपनीच्या देशी दारूच्या 192 बाटल्या किंमत 10 हजार 560 असा एकूण 60 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींवर कार्यवाही करण्यात आली आहे.
मुकुटबन येथून परवानाधारक दुकानातून अवैधरीत्या अनेक तरुण देशी दारूची खरेदी करून बाहेर विक्री करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील अनेक तरुण दुचाकीने दारूच्या बाटल्या अवैधरीत्या घेऊन जात आहेत.
तसेच मुकुटबनसह व परिसरातील तरुणही चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी करीत आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे दारूची तस्करी करणाऱ्यांवर वचक बसेल, अशी आशा नागरिक करीत आहेत.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा