निर्गुडा नदीत मतीमंद युवतीचा मृतदेह आढळला

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मंदर गावालगत वाहणारी निर्गुडा नदीच्या पात्रात एका युवतीचा मृतदेह आढळला. गुरुवार 24 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता दरम्यान ही घटना उघडकीस आली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यावर मृतक युवती मंदर गावातील बबिता बाळा बुरडकर (32) असल्याचे स्पष्ट झाले. मृतका ही मतीमंद असून तिचे लग्नही झाले नव्हते. तसेच तिला मिर्गी आजार असल्याचे बोलले जाते. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला. तसेच उत्तरीय तपासणीसाठी प्रेत वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. वणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा मर्ग दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Comments are closed.