विद्युत पुरवठा पूर्ववत करताना करंट लागून कामगाराचा दुर्दैवी मृ्त्यू

गोकुळनगर येथील घटना, पावसामुळे वीज पुरवठा झाला होता खंडीत... आई झाली एकाकी... कंपनीने आर्थिक मदत करण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: वादळी पावसानंतर खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करताना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन कंत्राटी विद्युत कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. येथील गोकूळनगर भागात आज दुपारी 3.30 वाजता दरम्यान ही दुर्देवी घटना घडली. रजत अवचट (24) रा. रंगारीपुरा वणी असे मृतक कामगाराचे नाव आहे. रजत हा त्याच्या आईसह राहायचा. रजतच्या मृत्यूमुळे त्याची आई एकाकी झाली आहे. रजतच्या आईला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी व परिचितांनी केली आहे.  

प्राप्त माहितीनुसार आज मंगळवारी दिनांक 14 जून रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान वणी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात शहरातील अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. पाऊस थांबल्याने महावितरणचे कर्मचारी वीज पुरवठा पूर्ववत करण्याच्या कामात लागले.

गोकुळनगर येथील वीज देखील वादळी वा-यासह झालेल्या पावसाने प्रभावित झाली होती. वीज कर्मचाऱ्यासोबत कंत्राटी कामगार असलेला रजत अवचट गोकुळनगर परिसरात एका घरावर चढून विद्युत पुरवठा सुरू करण्याचा काम करीत होता. दरम्यान त्याच ठिकाणाहून जाणा-या 11 के.व्ही.च्या विद्युत ताराला रजतचा अनावधानाने स्पर्श झाला. विजेच्या धक्क्याने तो जागीच कोसळला.

घटनास्थळी उपस्थित वीज कर्मचा-यांनी रजतला तात्काळ शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासणी करून त्याला मृत घोषित केले. मृतक रजत अवचटचा मृतदेह शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनेबाबत पोलिसांना कळविण्यात आले आहे. 1 जून रोजी प्रगती नगर येथे एका कंत्राटी कामगाराचा पोलवरून पडून मृत्यू झाला होता. दोन आठवडे होण्याच्या आधीच इलेक्ट्रिकचे काम करणा-या आणखी एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला आहे.  

आर्थिक मदतीची मागणी
रजत हा कंत्राटी पद्धतीने काम करीत होता. रजतला वडील नसून तो आईसह रंगारीपुरा येथे राहतो. तो घऱचा एकमेव कर्ता पुरुष होता. रजतच्या मृत्यूमुळे त्याची आई एकाडी पडली आहे. कंपनीने आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी रजतच्या नातेवाईकांनी केली आहे. मदत मिळवून देण्यासाठी विविध संघटनेने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही रजतच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा:

चक्क हैदराबादहुन तो ‘मटका’ लावायला आला वणीत !

 

उद्या वणीतील कल्याण मंडपम येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन

 

देशातील प्रख्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम आता वणीत

पालकांचा कल आता जगप्रसिद्ध सिंगापूर पॅटर्नकडे

चला डायनासोर्सच्या थरारक दुनियेत… जुरासिक वर्ल्ड सुजाता थिएटरमध्ये रिलिज

 

 

Comments are closed.