दीपक चौपाटी परिसरात राडा, एकावर सत्तूरने हल्ला

खरेदीचे पैसे मागितल्याच्या रागातून हल्ला

0

विवेक तोटेवार, वणी: आज दुपारी 4 वाजताच्या दरम्यान दीपक टॉकीज चौपाटीवर एका छोट्या व्यावसायिकावर सत्तूरने हल्ला करण्यात आला. यात एक इसम जखमी झाला आहे. आठवडी बाजार सुरू असताना ही घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी दिनांक 21 मार्च रोजी वणीच्या दीपक चौपाटी परिसरात आठवडी बाजार असतो. बाजारात अनेक छोटे व्यावसायिक व्यवसाय करण्याकरिता ये असतात. असाच एक व्यापारी मारोती विठ्ठल मेश्राम (40) हा वडगाव (टीप) वरून वणीच्या बाजारात चप्पल जोडे व कपडे विकण्याकरिता आला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्याच्या दुकानात राहुल पाणघाटे (30) रा. रामपूरा वार्ड हा जोडा घेण्यासाठी आला होता. राहुलने जोडा घालून बघितला व मारूतीच्या दुकानात ठेवलेल्या वस्तू फेकून दिल्या. पैसे मागितले असता आणून देतो म्हणून जोडा घालून निघून गेला.

थोडा वेळाने तो पुन्हा दुकानात आला व त्याने मारूतीच्या डोक्यावर धारदार सत्तूरने वार केला. यात मारूतीच्या डोळ्याच्या वर जखम झाली. हा प्रकार भर बाजारात झाला. मारोतीला उपस्थितांनी दवाखान्यात नेले. त्यानंतर पोलिसांनी मारोती याच्या फिर्यादीवरून राहुल पाणघाटे यांच्याविरुद्ध कलम 324 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विठ्ठल बुरेवार करीत आहे.

हे देखील वाचा:

कोरोनाचा विस्फोट, आज आढळले तालुक्यात तब्बल 29 रुग्ण

Leave A Reply

Your email address will not be published.