अडेगाव येथे विद्युत बिल भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी
नवनिर्वाचित सरपंचांचे विद्युत उपविभागीय अधिका-यांना निवेदन
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव ग्रामपंचायत दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत आहे. या परिसरामध्ये घरगुती व शेतीतील वीज कनेक्शन धारकांची संख्या 1 हजारा पेक्षा अधिक आहे. अडेगावच्या आजूबाजूला खातेरा, येडद, येडशी, आमलोन ही गावे असून या सर्व गावातील वीज धारकांना वीजबिल भरण्याकरिता मुकुटबन येथे जावे लागते.
शेतीचे, शासकीय व इतर कामे सोडून वीज बिल भरण्याकरिता जावे लागते. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीजबिल भरणा केंद्र अडेगाव ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध झाल्यास जनतेला नाहक त्रास होणार नाही तसेच वरील गावातील जनतेला जवळ असल्याने त्रास कमी होणार व सामान्य जनतेला या केंद्राचा लाभ होईल.
अडेगाव येथे वीजबिल भरणा केंद्र झाल्यास नागरिकांचा त्रास वाचेल. त्यामुळे अडेगावात वीजबिल भरणा केंद्र सुरू करावे, अशी मागणी अडेगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सीमा लालसरे यांनी उपविभागीय अधिकारी झरी जामनी यांच्याकडे केली. यावेळी विद्युत अधिकारी हेमंत लटारे, भास्कर देवगडे, राहुल ब्राह्मणे, रमेश जाधव, राहुल निंदेकर तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.
सर्वसामान्य जनतेकरिता व शेतकरी बांधवाकरिता लवकरच अडेगाव येथे विज बिल भरना केंद्र सुरू करू व त्याचा त्रास कमी करू:
सहायक अभियंता हेमंत लटारे
हे देखील वाचा:
लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून घरी आला आणि सरपंच झाला