ख्यातनाम त्वचारोगतज्ज्ञ डॉ. प्रियंका संतोष भोयर यांचे झोपेतच निधन

शवविच्छदन अहवालानंतरच कळेल मृत्युचे नेमके कारण

बहुगुणी डेस्क, वणी: डॉ. प्रियंका नेहमीप्रमाणेच रात्री निवांत झोपल्यात. सकाळ उलटली तरी त्या उठल्या नाहीत. नंतर लक्षात आलं की डॉ. प्रियंका संतोष भोयर (37) यांचं झोपेतच निधन झालं. त्यांना झोपेतच हृदयविकाराचा किंवा अन्य झटका आल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यांच्या मृत्युचे नेमके कारण कळू शकले नाही. म्हणून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. डॉ. प्रियंका आणि डॉ. संतोष भोयर यांचे गांधी चौकात येथे वात्सल्य बाल रुग्णालय आहे. डॉ. प्रियंका ह्या त्वचारोग तज्ज्ञदेखील होत्या. दवाखान्याच्या वरच्या मजल्यावरच ते राहत होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वांना धक्का बसला. डॉ. प्रियंका ह्या रुग्णप्रिय होत्या. त्यांच्या शांत, सुस्वभावी व मनमिळाऊ स्वभावाची सर्वत्र ख्याती होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली. डॉ. प्रियंका यांच्या पश्च्यात पती डॉ. संतोष भोयर व सात वर्षांची मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

Comments are closed.