आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित आघाडीची बैठक

परिसरातील 2 महत्त्वाच्या नेत्यांचा वंचितमध्ये पक्षात प्रवेश

0

जितेंद्र कोठारी, वणी: येत्या काही दिवसात वणी नगर परिषद तसेच नगर पंचायत निवडणुक कार्यक्रम घोषित होणार आहे. या निवडणुकीत वणी विधानसभेत असलेल्या नगर परिषदेवर व नगर पंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी आपली शक्ती पणाला लावून काम केले पाहिजे. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांनी व्यक्त केले.

दि. 3 एप्रिल रोजी दु 2 वाजता येथील नगाजी महाराज सभागृहात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या तालुका कार्यकारणी, महिला कार्यकारणी, शहर कार्यकारणी, व युवा कार्यकारणी गठीत संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत हे आवाहन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारणीचे नुकतेच गठन झाले आहे. त्यानंतर तालुका पातळीवरील कार्यकारणी गठीत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जोमाने कामाला लागली आहे.

यावेळी जिल्हा महासचिव ऍड. श्याम खंडारे, जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, अरुण कपिले, लक्ष्मण पाटील, मिलिंद पाटील, दिलीप भोयर, ऍड. विप्लव तेलतुंबडे, करुणा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व कार्यकारणी साठी इच्छुकांचे अर्ज भरून घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन किशोर मुन यांनी केले. आभार प्रा. आनंद बेले यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कपिल मेश्राम, भारत कुमरे, राकेश तावडे, प्रकाश मून, डोंगरे, ओमेश परेकर, बाळू निखाडे, नगराळे, अजय खोब्रागडे, नरेंद्र खोब्रागडे, अनिल पथाडे , शारदा मेश्राम, रेखा पाटिल, सुजाता नगराळे आदींनी परिश्रम घेतले.

वणीतील दोन नेत्यांचा वंचित मध्ये प्रवेश
परिसरातील मुस्लिम समाजाचे जेष्ठ नेते, लेखक, विचारवंत जिया अहेमद व आदिवासी समाजाचे नेते गेडाम यांचा आज वंचित बहुजन आघाडीचे जिलाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे वंचितची ताकत चांगलीच वाढणार आहे.

हे देखील वाचा:

कोरोना रुग्णसंख्येने तोडले सर्व रेकॉर्ड, आज 65 पॉजिटिव्ह

वणी न.प. अधिका-याला 25 हजारांचा दंड, माहिती देण्यास टाळाटाळ करणे भोवले

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.