माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वणीत
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण, भाजपचे आजी माजी आमदारही राहणार उपस्थित
जितेंद्र कोठारी, वणी: तब्बल पावणे दोन कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (नगर परिषद बगीचा) चे लोकार्पण शुक्रवार 1 ऑक्टोबर रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शहरातील देशमुखवाडी भागात 10 कोटीच्या निधीतून बांधकाम करण्यात आलेले अद्ययावत नाट्यगृहाचे उदघाटनही माजी मुख्यमंत्री करणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे उद्या सकाळी 11 वाजता नागपूर येथून सडकमार्गे वणीत आगमन होणार आहे. लोकार्पण सोहळयासाठी नगर परिषद प्रशासनकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे स्वतः अथक परिश्रम घेत आहे. उद्यान व नाट्यगृह उदघाटन प्रसंगी जिल्ह्यातील भाजपचे सर्व आजी माजी आमदार व इतर नेतेमंडळी शुक्रवारी वणीत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
वणी नगर परिषदवर भाजपची सत्ता असून मागील 5 वर्षात करोडों रुपयांचे विकास कामे शहरात करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने वर्धा नदीतून पाणी पुरवठा योजना, सांस्कृतिक भवन बांधकाम, भूमिगत गटार योजना, अंतर्गत रस्ते बांधकाम, बगीचे व इतर अनेक विकास कार्य करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री व विधानसभेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे वणी आगमन निमित्त वणी पोलीस प्रशासन कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
हे देखील वाचा:
मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5
Comments are closed.