वजन काट्यात फरक पडल्याने कापूस खरेदी केली बंद

सभापती बुरेवार यांनी घेतली शेतकऱ्यांच्या तक्रारीची घेतली दखल

1

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील बिरसाई पेठ येथील एका शेतकऱ्यांने सीसीआय मार्फत कापूस विक्रीकरिता मुकुटबन येथील बालाजी जिनिंगमध्ये २४ नोव्हेंबर रोजी कापूस भरलेली गाडी घेऊन आला. बाजार समितीच्या काट्यावर वजन केल्यानंतर बालाजी जिनिंगमध्ये वजनकाटा केला.

Podar School 2025

समितीच्या काट्यापेक्षा २५ किलो कमी वजन आल्याने शेतकरी अचंबित झाले. सदर शेतकऱ्याने कृषी उत्पन्न बाजार समिती, तहसीलदार व इतर ठिकाणी त्याची तक्रार केली. तक्रार प्राप्त होताच सभापती संदीप बुरेवार यांनी तोंडी आदेश देऊन जिनिंगमधील कापूस खरेदी बंद केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुसऱ्या दिवशी २५ नोव्हेंबररोजी सकाळी वसंत जिनिग ,बाजार समिती मधील वाजनकाट्याचे तपासणी केली असता एका किलोचाही फरक आढळला नाही. त्यानंतर बालाजी जिनिंग मधीलही काटा तपासणी केली असता वाजनकटा बरोबर दाखविला. मग एक दिवसापूर्वी फरक कसा आला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सभापती बुरेवार यांनी त्वरित मापारी यांची बैठक घेऊन याबाबत विचारपूस केली व माहिती जाणून घेतली. जिनिंग मालक यांना नोटीस बजावली व वारंवार अशी तक्रार आल्यास जिनिंगला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच सदर तक्रारीबाबत खुलासा मागण्यात आला आहे.

जोपर्यंत समाधान होणार नाही तोपर्यंत बालाजी जिनिंगमधील सीईसीआयची कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. वसंत जिनिग व ओम साई जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत जिनिंगमधील कापूस खरेदी बंद करून तक्रारकर्त्या शेकऱ्याला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न बाजार समितीकडून केला गेला आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेऊ

जिनिंगमध्ये शेतकऱ्यांना ग्रेडिंग व भाव व्यवस्थित मिळत आहे. सर्वांचे कार्य चांगले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत कोणतीही नाराजी नाही किंवा तक्रार नाही. परंतु अशी तक्रार आल्यास आम्ही शेतकऱ्यांनाच न्याय देऊ. कारण बाजार समिती ही शेतकऱ्यांची असून त्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेणार.
संदीप बुरेवार, सभापती कृ. उ. बाजार समिती

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

 

Leave A Reply

Your email address will not be published.