विवेक तोटेवार, वणी: कर्तव्यात कसूर ठेवण्यात आल्याच ठपका ठेऊन वणीतील 4 पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. हे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे व या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुर्वे यांनी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांची भेट घेत याबाबत निवेदन सादर केले.
अमरावतील येथील डीआयजीच्या पथकाने वणीतील अवैध धंद्यांवर एकाच वेळी कार्यवाही केली. यात 4 अवैध मटका अड्डे व दोन तंबाखू व्यावसायिकांवर कार्यवाही करण्यात आली होती. या प्रकरणी 42 आरोपींना अटक करण्यात आली होती. ही कारवाई होताच जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी कर्तव्यात कसूर ठेवल्याच्या कारणावरून 4 पोलीस कर्मचा-यांना निलंबित केले तर 19 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
या प्रकऱणी कर्मचा-यांवर करण्यात आलेली कार्यवाही ही अन्याकारक असून वरिष्ठांच्या आदेशाने शहरात अवैध धंदे सुरू आहे असा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून कर्मचा-यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी स्वप्निल धुर्वे यांनी केली.
हे देखील वाचा:
Comments are closed.