मोमिनपुरा येथील तरुण राजूर येथून बेपत्ता

कुणाला आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील मोमिनपुरा येथील एक तरुण राजूर येथून बेपत्ता झाला आहे. मोहम्मद हातिम मोहम्मद इसार असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी दिनांक 7 जानेवारी रोजी रात्री घरातील सर्व झोपेत असताना तो राजूर येथून नातेवाईकाच्या घरातून बेपत्ता झाला आहे. मोहम्मद हातिम हा आपल्या आईसोबत वणीहून राजूर येथे एका नातेवाईकांच्या घरी गेले होते. शुक्रवारी राजूर येथे नातेवाईकाच्या घरी रात्री घरी सर्व झोपले. मात्र घरच्यांना सकाळी मोहम्मद हातिम हा आढळून आला नाही. शोधाशोध केल्यानंतर तो न आढळल्याने तरुणाच्या आईने वणी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दाखल केली. पोलीस तरुणाचा शोध घेत आहे. कुणाला आढळून आल्यास संपर्क साधावा असे आवाहन बेपत्ता तरुणाच्या आईने केले आहे.

Comments are closed.