शारीरिक संबंधाची लागली चटक, बळजबरी करताच झाली अटक

अल्पवयीन मुलीवर बळजबरी अत्याचार करणा-या तरुणाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी: मोठ्या भावाचा मित्र असल्यामुळे त्याचे नेहमी घरी येणे जाणे होते. अशातच एकेदिवशी त्याची नजर मित्राच्या अल्पवयीन बहिणीवर पडली. त्यावेळी मुलगी 8 वी मध्ये शिकत होती. एक दिवस मुलगी घरी एकटी असल्याचे बघून भावाच्या मित्राने तिला प्रपोज केले. हळू हळू दोघांमध्ये प्रेमाचा बहार फुलला. तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. घराशेजारी घर असल्यामुळे संधी मिळताच दोघे भेटायचे.

त्या तरुणाला संबंधाची चकटक लागली होती. 10 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता सदर तरुण मुलीच्या घरी पोहोचला व त्याने हात धरून मुलीला बाहेर जाण्यासाठी बळजबरी करू लागला. मुलीने रात्रीच्या वेळी बाहेर जाण्यास नकार दिला असता त्यांने मुलीला केस धरून मारहाण केली. घडलेल्या घटनेमुळे हादरलेल्या अल्पवयीन मुलीने 10 जानेवारी रोजी वणी पोलीस स्टेशनमध्ये युवकाविरोधात बलात्कार व मारहाण केल्याची तक्रार नोंदविली. तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी गणेश गोविंदा वरारकर (21) रा. चिखलगाव विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार चिखलगाव येथील अल्पवयीन मुलगी ही तिच्या आई व भावासह आपल्या आजोबांच्या घरी राहत होती. आठवीपर्यंत शिक्षण चिखलगाव शाळेत झाल्यानंतर शहरातील एका महाविद्यालयात तिनं प्रवेश घेतला. शाळेत शिकत असतानाच तिच्या भावाचा मित्र गणेश वरारकर याने तिला प्रेम जाळ्यात ओढले. मी तुझ्यासोबत लग्न करणार, असे आमिष दाखवून मार्च 2018 ते जाने. 2022 पर्यंत त्याने तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. 6 जानेवारी रोजी महाविद्यालयात लसीकरण साठी गेली असता गणेश यांनी तिला मोटरसायकलवर बसवून वणी कायर मार्गावर 18 नंबर रेल्वे पुलाजवळ झुडपी जंगलात नेऊन तिच्यावर दुष्कर्म केले.

अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्याद वरुन वणी पोलिसांनी आरोपी गणेश गोविंदा वरारकर विरुद्द कलम 376(3), 376(2)(J), 376(2)(N), 452, 323, 506 तसेच बालकांचे लैंगिक शोषण कायदा (पोस्को) कलम 4,6 अनव्ये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपीला मंगळवार 11 जानेवारी रोजी पांढरकवडा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, प्रभारी ठाणेदार गजानन करेवाड यांचे मार्गदर्शनात पीएसआय शिवाजी टिपूर्णे करीत आहे.

हे देखील वाचा:

सावधान… वणी तालुक्यात कोरोना पुन्हा काढतोय डोके वर

संपत आली जवानी, तरी सास-याची अधुरी कहाणी

करणवाडीजवळ दुचाकीचा अपघात, वणीतील दोन तरुण जखमी

Comments are closed.