पाण्याबाबत तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलांचा उपसरपंचांसोबत वाद
मुकुटबनच्या महिलांची तीन दिवसांपासून पाण्याकरिता भटकंती
सुशील ओझा, झरी: वॉर्डात पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार घेऊन ग्रामपंचायतीमध्ये गेलेल्या महिलांचा उपसरपंचासोबत वाद झाला. यात उपसरपंचांनी केसेस लावण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
मुकुटबन येथील वॉर्ड क्र 2 मध्ये गेल्या तीन दिवसांपासून काही घरांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतद्वारे पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांचे दैनंदिन कामे खोळंबली आहे. वापरासाठी व पिण्यासाठी पाणी नसल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत. अखेर पाणी पुरवठा होत नसल्याचे तक्रार घेऊन महिला 5 एप्रिल रोजी ग्रामपंचायत मध्ये गेल्या.
त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच अनिल कुंटावार, सदस्य संजय परचाके व कर्मचारी उपस्थीत होते. पाणी पुरवठा होत नसल्याचे महिलांनी तक्रार केली. यावेळी त्यांच्यात वाद झाला. अनिल कुंटावार यांनी महिलांना आम्ही आमच्या मर्जीने पाणी सोडू असे म्हणत कार्यालयाबाहेर तसेच तुमच्यावर सर्वांवर केसेस करू अशी धमकी दिली, असा महिलांचा आरोप आहे. तसेच उपसरपंचांनी फोन करून पोलिसांना ग्रामपंचायत मध्ये बोलाविले. गावातील जनेलेला पाण्याबाबतची समस्या ग्रामपंचायतला जाऊन नऊ सांगायचे तर कुणाला सांगायचे असा संतप्त प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे.
वॉर्ड क्र २ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सकाळी पाणीवरवठा केला जात होता तो पुरवठा त्याचवेळी करावा व पाण्याची समस्या त्वरित सोडवावी अन्यथा ग्रामपंचायत समोर उपोषनास बसू असे निवेदन प्रभा पारशिवे, इंदिरा पारशिवे, उषा पारशिवे, मीरा पारशिवे, चंद्रकला भणारकर, शांता पारशिवे, मीना पारशिवे, तारा मांढरे, सारिका तोकलवार, लक्ष्मी पारशिवे, लक्ष्मी इंगोले, रेखा मंदुलवार, वळकस्मि तोकलवार सह अनेक महिलांनी ग्रामपंचायत सह गटविकास अधिकारी व पोलीस स्टेशन ला दिलेल्या निवेदनातून केला आहे.
पाणी समस्या सोडविण्याच्या प्रश्नावरून माजी सरपंच शंकर लाकडे व उपसरपंच अनिल कुंटावार यांच्यात चांगलीच जुंपली होती. वॉर्ड क्र २ मधून लाकडे दुसर्यांदा निवडून आले . व त्यांच्या वॉर्डात पाण्याची समस्या निर्माण झाल्याने ते सोडविण्याकरिता ग्रामपंचायत मध्ये गेले असता उपसरपंच कुंटावार यांच्याशी वाद झाला हा वाद एवढा वाढला की पोलिसांना पाचारण करावे लागले. तर वाद पाहण्याकरिता प्रचंड गर्दी जमली होती.
वॉर्ड क्र दोनच्या समस्या सोडविण्याचा माझा अधिकार आहे वॉर्डातील महिला पाणी मिळत नसल्याने त्रस्त झाले असे बोलताच कुंटावार यांनी आम्ही रात्री १२ वाजता नंतर नळ सोडतो व उद्धट बोलल्यावरून चांगलीच खडाजंगी झाली. ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामवासीयांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न सोडून वयक्तिक राजकारण करणे सुरू केल्याने जनतेत रोष निर्माण झाला आहे. गेल्या ५ वर्षात संपुर्ण गावात पाण्याची समस्या निर्माण झाली नाही. मग मी निवडून आलेल्या वॉर्डात समस्या कशी झाली असा प्रश्न उपस्थित केला. सदर पाणीटंचाई चे कृत्य हेतुपुरस्सर करीत असल्याचा आरोप शंकर लाकडे यांनी केला आहे. पाणी टंचाईच्या मुद्यावरून महिला आक्रमक झाल्या आम्हला त्रास देणाऱ्याला त्यांची जागा दाखवू असेही बोलत होते.
हे देखील वाचा: