सावंगी व कोना येथील पूरग्रस्तांना औषधींचे वाटप
संजय देरकर, डॉ. विलास बोबडे व डॉ. सचिन दुमोरे यांचा पुढाकार
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे नदीलगतच्या 11 गावांना पुराने वेढा घातला आहे. तर सावंगी, शिवणी, मुंगोली, उकणी ह्या गावासह जवळपास 15 गावात पुराचे पाणी घरात शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पुराचे पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे. मात्र त्यामुळे पूरग्रस्त गावक-यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही काळजी घेत संजय देरकर यांच्या तर्फे व डॉ. सचिन दुमोरे व डॉ. विलास बोबडे यांच्या माध्यमातून सावंगी व कोना येथील पूरग्रस्तांना औषधीचे वाटप करण्यात आले. सदर औषधी ही नायगाव येथील आशा सेविकांना सुपूर्द करण्यात आली. याशिवाय आज दुपारी पूरग्रस्तांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कायम तत्पर – संजय देरकर
पुरामुळे सध्या नदीकाठच्या लोकांच्या डोक्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. मात्र या संकटातही ते एकटे नाही. आम्ही त्यांच्या मदतीसाठी कायम तत्पर आहोत. त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पुरामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे डॉक्टर सहका-यांना सोबत घेऊन पूर प्रभावित गावांमध्ये आरोग्य शिबिर आणि औषधी वाटपाचे काम सुरू आहे.
– संजय देरकर, उपाध्यक्ष, यवतमाळ जि.म.स.बँ.
500 गावक-यांची जेवणाची व्यवस्था
कोना व झोला गावातील लोकांना सावर्ला येथे रेस्क्यू करण्यात आले आहे. दरम्यान संजय देरकर व किरण देरकर यांनी सावर्ला येथे धाव घेत त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्यातर्फे पाचशे लोकांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी किरण देरकर यांनी स्वत: पूरग्रस्तांना जेवण वाढून दिले.
यावेळी आनंद बोबडे, ज्ञानेश्वर देवतळे, प्रवीण खानझोडे, विलास कालेकर, भगवान मोहिते, लोकेश बोबडे, विठ्ठल बोन्डे, संजय डावरे, प्रभाकर बोबडे, शेखर वाभिटकर, हेमंत बोबडे, धनराज राजूरकर, विनोद वैरागडे, मिलाप कोल्हे, रत्नाकर बोबडे इत्यादींची उपस्थिती होती.
Comments are closed.