अखेर पिसाळलेला कुत्रा ठार

कुत्र्याच्या हल्ल्यात झालेत15 जणं जखमी

0

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव परिसरातील एक पिसाळलेला कुत्रा अखेर ठार झाला. या पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 15 जणांना शनिवारी चिखलगावात अनेकांना चावा घेतला. लहान बालकांसह रस्त्यावर दिसेल त्यावर हा कुत्रा हल्ला करायचा.

कुत्र्याने महादेवनगर, बोधेनगर व जुन्या चिखलगाव परिसरात अक्षरशः हैदोस घातला. कुत्र्याच्या हल्ल्यातल्या जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आलेत. प्रत्यक्षदर्शीनुसार चिखलगाव येथीलच एका घरातील पाळीव कुत्र्याने हा धुमाकुळ घातला. शनिवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान घराबाहेर खेळत असलेल्या साची, नेहा व इतर दोन बालकांनादेखील त्याने चावा घेतला.

बालकांच्या ओरडण्यावरून जमा झालेल्या गावकऱ्यांनी कुत्र्याचा पाठलाग केला. त्यामुळे रस्त्यावर जे मिळतील त्यांवर हल्ला चढवून कुत्र्यांने हातापायाचा चावा घेऊन जखमी केलं. त्यानंतर पिसाळलेला कुत्रा गावकऱ्यांच्या नजरेतून गायब झाला.

काही युवकांनी हातात काठ्या घेऊन त्याचा कसून शोध घेतला. महादेवनगरीच्या प्रवेशद्वारजवळ तो कुत्रा दिसून आला. युवकांनी चारही बाजूने घेरा घालून लाठ्याकाठ्यांनी प्रहार करून पिसाळलेल्या कुत्र्याला ठार केले.

वणी शहर व आजूबाजूच्या गणेशपूर, चिखलगाव, लालगुडा परिसरात मोकाट कुत्रे आणि डुकरांच्या त्रासापायी नागरिक हैराण झाले आहे. सध्या विदेशी प्रजातींचे कुत्रे पाळणे हे स्टेटस सिम्बॉल झाले आहे. मात्र बलशाली व हिंसक प्रजातीच्या ह्या कुत्र्यांमुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हेदेखील वाचा

अन् त्या प्राध्यापकाने चक्क कोरोनालाच लिहिलं पत्र

हेदेखील वाचा

आज वणी तालुक्यात 7 पॉजिटिव्ह

 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.