डोर्ली येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

0

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यातील डोर्ली येथील एका शेतकऱ्याने कर्जामुळे नदीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळ दरम्यान उघडकीस आली. मैफत बापुराव मोहुर्ले वय (52) रा.डोर्ली असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मारेगाव तालुक्यातील डोर्ली येथील मैफत बापुराव मोहुर्ले वय 52 या शेतकर्याने कर्जाला कंटाळून ता.१ डिसेंबरला दुपार दरम्यान नजिकच्या निर्गुडा नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्यावर मध्यवर्ती बँकेचे कर्ज होते. त्याची परतफेड होऊ शकत नसल्याने त्याने हा निर्णय घेतल्याची शंका नजिकच्या नातेवाईकानी व्यक्त केली. तो दुपारी फिरायला जातो म्हणून घरुन निघून गेला होता आणि उशिरा पर्यत घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयानी शोधाशोध केली असता सायंकाळ दरम्यान मैफतचा मृतदेह निर्गुडा नदीत तरंगताना दिसून आले.

उत्तरणीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकड़े तीन एकर शेतजमीन असून त्याचे पश्चात मुलगा संतोष, तीन मुली आहेत. तिन्ही मुलींचे लग्न झाले आहे. लग्नाच्या कर्जाचा डोंगर कमी होत नसताना यंदा दुष्काळी परीस्थितीने आणखीच परिस्थिती गंभीर झाल्यानेच हा निर्णय घेतला असल्याची चर्चा होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.