बोगस बीटी बियाण्याची विक्री करणाऱ्यांना अटक

पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त, शिरपूर पोलिसांची कार्यवाही

0
विलास ताजने, वणी: बोगस बीटी बियाण्याची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीला शिरपूर पोलिसांनी दि.२२ शनिवारला अटक केली. यावरून वणी तालुक्यातील गावांत बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या मस्तकी मारल जात असल्याचे दिसून येत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चंद्रपूर  जिल्ह्यातून वनोजा – शिंदोला मार्गे बोगस बीटी बियाणे घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. सदर महितीच्या आधारे शनिवारी दुपारी १२ वाजता पोलिसांनी शिंदोला मार्गावर सापळा रचला. यावेळी दुचाकीवर बियाणे घेऊन येणाऱ्या दोघांची चौकशी केली असता पंधरा हजार रुपयांची बोगस बीटी बियाणे आढळून आले.
पोलिसांनी प्रदीप पुनवटकर, अभिचंद शेडमाके रा. निमनी (झरी) या शेतकऱ्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी बियाणे कुठून आणले याची माहिती दिली. पोलिसांनी रात्री सतिश डाहूले (माथा), राजेश भोयर (सोनूर्ली), बाळा बलकी, प्रमोद बलकी (हिरापूर) ता. कोरपना यांना ताब्यात घेतले. यात अनेक जण गुंतले असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सदर घटनेची माहिती तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांना दिली. घटनेचा पंचनामा केला.
Leave A Reply

Your email address will not be published.