आज संध्याकाळी वणीतील वसंत जिनिंग लॉनमध्ये जाहीर सत्कार व व्याख्यानाचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज शनिवारी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सं. 7 वाजता वणीत भव्य सत्कार सोहळा व जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. वसंत जिनिंग लॉनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिद्ध कवि आणि सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश वाकुडकर, नागपूर हे या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते जातनिहाय जनगना आणि ओबीसींची भूमिका यावर आपले मत व्यक्त करणार आहेत.

माजी कुलगुरु भालचंद्र चोपणे यांचा कार्यक्रमात जाहीर सत्कार केला जाणार आहे. याशिवाय नवनिर्वाचित विधानसभा आमदार सुधाकर अडबाले, धीरज लिंगाडे व अभिजीत वंजारी यांचा देखील सत्कार केला जाणार आहे. ओबीसी जनगणना कृती समिती व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. वामनराव चटप राहणार आहेत. तर उद्घाटक खा. बाळू धानोरकर राहणार आहेत. तर रंगनाथ स्वामी अर्बन लिमीटेड या पथसंस्थेचे अध्यक्ष संजय खाडे हे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष राहणार आहेत. कार्यक्रमाला आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. सुभाष धोटे, आ. प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी आमदार संजय धोटे, ओबीसी महासंघाचे अशोक जिवतोडे व ओबीसी जातनिहाय जनगणना समितीचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार यांची या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाला वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Comments are closed.