साखरा (को) व परिसरातील गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरू
सततच्या लाईट जाण्यामुळे गावकरी त्रस्त
अमोल पानघाटे, साखरा (को): पावसाळा सुरू होताच तालुक्यात शेवटचे टोक असलेल्या साखरा (कोलगाव) येथे विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. सततच्या वीज गुल होण्यामुळे नागरिक तर त्रस्त झाले आहेत. शिवाय त्यामुळे विजेवरील चालणा-या उपकरणावर याचा परिणाम होऊन ती निकामी होण्याची भीतीही निर्माण झाली आहे.
गेल्या 8 ते 10 दिवसांपासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये ही समस्या उद्भवली आहे. यामुळे परिसरातील साखरा, जुगाद, माथोली, मुंगोली या गावांचा वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. विजेच्या खेळखंडोबा नियमित झाला आहे. वीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. ही समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी होत आहे.
हे देखील वाचा:
येनक खून प्रकरणाचे गुढ उलगडले, अवघ्या दोन तासांमध्ये प्रकरणाचा छडा