आज वणीतील सार्थक लॉन येथे वक्तृत्व स्पर्धा

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त खुल्या स्पर्धेचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ओबीसी, (VJ/NT/SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, झरी, मारेगाव च्या वतीने आज वणीत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दुपारी 2 वाजता शहरातील सार्थक लॉन येथे आयोजित करण्यात आली आहे. ‘ओबीसी जातनिहाय जनगणना काळाची गरज’ हा या स्पर्धेचा विषय आहे.

सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षिस 3000 रुपये, द्वितीय 2000 रुपये, तृतीय 1000 रुपये आणि दोन 500 रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात येणार आहे. सोबतच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

स्पर्धेसाठी नोंदणी आवश्यक असून वैभव ठाकरे- 7709473091, प्रदीप बोरकुटे- 8788703302, राम मुडे- 9823178591, विकास चिडे- 7744929747, गजानन चंदावार- 8888422662 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.