बाजारपेठ सुरू ठेवण्यास 2 तासांचा आणखी अवधी द्या
शिवसेना व्यापारी आघाडीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
विवेक तोटेवार, वणी: लॉकडाऊनमुळे शहरातील व्यापारी व व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने तसेच व्यवसायासाठी वेळ अपुरा असल्याने गर्दी होत असल्याने लॉकडाऊनचा वेळ शिथिल करावा व व्यवसायासाठी 2 ते 3 तास अधिक द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या व्यापारी आघाडी तर्फे करण्यात आली.
सध्या शहरात लॉकडाऊनचा वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे. ग्राहकांना व्यवसायासाठी वेळ कमी पड़त असल्याने दुकानात एकाच वेळी गर्दी होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या वेळेत शिथिलता आणून व्यवसायासाठी संध्याकाळी 7 किंवा 8 पर्यंत वेळ द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या व्यापारी आघाडीतर्फे करण्यात आली. याबाबत आज जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.
शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा व व्यापारी आघाडीचे जिल्हा संघटक हिमांशु बत्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. निवेदनावर सौरभ खडसे, व्यापारी आघाडी उप शहर प्रमुख, मोंटू वाधवानी, आकाश उईके, सोनू पठाण, खुशाल मेहता, अनुप चटप इत्यादींच्या सही आहेत.
हे देखील वाचा: