प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे ३० आॅक्टोबरपासून आमरण उपोषण

वे.को.ली. प्रशासनाचे प्रकल्पग्रस्ताकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला व वारसदारांना नोकरीत सामावून घेन्यासाठी, वणी तालुक्यातील मौजा बेलोरा, बेलसनी, कुंभारी (रिट) येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी दि. ३० आॅक्टोबर २०१७ पासून अापल्या न्याय मागणी साठी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे आमरण उपोषणाला बसत आहे. हे उपोषण मागण्या पूर्ण होई पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वणी बहुगुणीला दिली आहे.

तीन गावातील प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना वे.को.ली. प्रशासनाकडुन अनेक दिवसांपासून अधिग्रहित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवानी दि.१३आॅक्टोबरला लेखी निवेदनाद्धारे मा. जिल्हाधिकारी यवतमाळ, मुख्य महाप्रबंधक वे.को.ली., उर्जाग्राम ताडाळी, तसेच इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना निवेदन सादर केले, परंतु संबधित प्रशासनाने त्यांच्या निवेदकाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे प्रकल्प ग्रस्त शॆतकरी संतप्त होऊन येत्या ३० आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात समोर आमरण उपोषण करत आहे.

वे.को.ली. मध्ये गेलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा मोबदला व कुटुंबातील वारसदारांना नोकरी मिळावी ही प्रकल्पग्रस्ताची प्रमुख मागणी आहे. पण प्रशासनाने मागणींची दखल न घेतल्याने येत्या ३० आॅक्टोबराला शिवराम रूषी बरडे, प्रविण रोगे, चंद्रकांत. पिंपळकर, सुरेश भोगळे, विशाल वासेकर, ज्योती लोहकरे, मीना गावंडे, सतिश पिदुरकर, नितेश भोंगळे, रुपेश पोतराजे आदी प्रकल्प ग्रस्त शेतकरी आमरण उपोषणाला बसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.