माजी आमदार पुट्टा मधू यांना आंध्रप्रदेश येथून अटक

तेलंगणा पोलिसांनी वणीतील कोळसा व्यावसायिकाच्या घरी राबवले होते सर्च ऑपरेशन

0

जितेंद्र कोठारी, वणी: वकील दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी शनिवारी पेद्दापल्ली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) चे माजी आमदार पुट्टा मधुकर यांना अटक केली. विशेष पोलिस पथकाने पुट्टा मधू यांना शनिवारी पहाटे आंध्रप्रदेशच्या वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम येथील एका हॉटेलच्या खोलीतून अटक केली.

Podar School 2025

पुट्टा मधू हे 1 मेपासून पेद्दापल्ली येथील आपल्या घरातून बेपत्ता होते. पुट्टा मधू यांच्या मोबाईल लोकेशनवरुन तेलंगणा पोलिसांच्या तब्बल 25 जणांच्या पथकाने 1 मेच्या रात्री 2 वाजता वणी येथील एका कोळसा व्यावसायिकाच्या यवतमाळ रोडवरील घरासह शेवाळकर परिसरातील सदनिका व छोरीया ले आउटमधील एका घरावर रेड केली. मात्र आरोपी पुट्टा मधू हा तेलंगणा पोलिसांना गवसला नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तेलंगणा राज्यातील मंथणी विधानसभेतून टीआरएस पक्षाचे माजी आमदार व पेदापल्ली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पुट्टा मधू यांचे वणी येथील एका कोळसा व्यवसायिकासोबत घनिष्ठ संबंध असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली होती.

तेलंगणा हायकोर्टाचे वकील दाम्पत्य गट्टू वामनराव आणि पी.व्ही. नागमणी यांची 17 फेब्रुवारी रोजी भरदिवसा रस्त्यावर हत्या करण्यात आली होती. हत्येप्रकरणी रामगुंडम पोलिसांनी पुट्टा मधू यांचा पुतण्या बिट्टू श्रीनिवाससह 4 आरोपींना अटक केली. तर वकील दाम्पत्याच्या हत्येमागे पुट्टा मधू किंवा इतर मोठ्या नेत्यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून चौकशी तेलंगणा पोलीस करीत आहे.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

Leave A Reply

Your email address will not be published.