शेताच्या कडेला लावलेली दुचाकी लंपास

मार्डी जवळील घटना, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

भास्कर राऊत, मारेगाव: मार्डी जवळील शेतामध्ये रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकी चोरी गेल्याची घटना उघडकीस आली. सोमवारी ही घटना घडली. याबाबत मारेगाव पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. 

बोदाड येथील अमोल सूर्यभान ढेंगळे (35) यांचे मार्डीजवळ शेत आहे. सोमवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी ते नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजताच्या दरम्यान आपली दुचाकी होंडा ड्रीम युगा (MH 29-AJ6422) ने मार्डी खैरी रस्त्यावरून 2 किमी अंतरावर असलेल्या शेतामध्ये गेले. त्यांनी रस्त्याच्या बाजूला शेताच्या कडेला आपली दुचाकी उभी केली व ते शेतामध्ये काम करण्यास गेले.

10 वाजताच्या दरम्यान त्यांनी गाडी ठेवलेल्या ठिकाणी बघितले असता त्या ठिकाणी त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. दरम्यान त्यांनी शेळ्या चारणारा गजानन भगत रा. खैरगाव व मोहन किनाके त्यांना विचारणा केली. त्यांनी मार्डीवरून तिघेजण एका गाडीवर आले. त्यापैकी दोघे परत गेले आणि एक जण तिथेच गाडीजवळ उभा असल्याची माहिती दिली.

त्या माहितीवरून त्यांनी गाडीचा शोध घेतला मात्र गाडी आढळून आली नाही. अखेर संध्याकाळी त्यांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम 371 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. गाडीजवळ उभ्या असलेल्या नांदेपेरा येथील संशयिताने दुचाकी चोरल्याचा आरोप तक्रारकर्त्याचा आहे.

हे देखील वाचा:

सालेभट्टी येथील बोगस कामाची चौकशी न केल्यास आमरण उपोषण

घोडदरा-शिवनाळा शिवारात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

Leave A Reply

Your email address will not be published.