चारचाकी वाहनाची ऑटोला धडक, चार जण जखमी

शहरालगतच्या लालपुलिया परिसरातील घटना

विवेक तोटेवार, वणी: शहरातील लालपुलिया परिसरात 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान एका ऑटोला झायलो या चारचाकी वाहनाने धडक दिली. या धडकेत ऑटो चालक व ऑटोत बसून असलेले चार जण जखमी झाल्याची घटना घडली. धडक देताच चारचाकी वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. वृत्त लिहितपर्यत पोलिसात अजून तक्रार दिली नाही.

Podar School 2025

ऑटो चालक ज्ञानेश्वर आनंदराव सुरतेकर (50) रा. एकता नगर हे मारेगाव तालुक्यातील बुरांडा येथे शेतावर पत्नी वृंदा व अब्दुल हब सिद्धीकी यांच्यासोबत त्यांच्या स्वमालकीच्या ऑटो (MH29 AM281) ने गेले होते. ते राणानुर सिद्धीकी यांच्याकडे दिवानजी म्हणून काम करतात. सायंकाळी 5 वाजता दरम्यान त्याच ऑटोने ते परत येत होते. तेव्हा एक महिला त्यांच्या ऑटोत बसली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ते सायंकाळी 6 वाजता वणीच्या यवतमाळ रोडवरील वरोरा बायपास येथून वाणीकडे वळण घेत होते. त्याच वेळी वरोरा बायपास वरून येणारी झायलो गाडी क्रमांक MH34 AM1798) ही भरधाव वेगाने येऊन ऑटोला जोरदार धडक दिली. या धडकेत ऑटो दूर फेकल्या गेला. तर ज्ञानेश्वर, त्यांची पत्नी व अब्दुल हब सिद्धीकी हे जखमी झाले.

यात ज्ञानेश्वर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला हाताला व पायाला दुखापत झाली आहे. तर त्यांच्या पत्नीला डोक्याला मार लागला व छातीला दुखापत झाली आहे. तर अब्दुल हब यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. वृत्त लिहितपर्यत पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. यामध्ये नुकसान भरपाई देण्याचे चारचाकी वाहनातील एक व्यक्तीने बोलले. परंतु त्याने घटनास्थळावरून पोबारा केल्याचे प्रत्यक्ष दर्शीचे म्हणणे आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.