संतापजनक: उपोषणकर्त्या बेरोजगार तरुणांची फसवणूक

आमदार आणि बेरोजगार तरुणांमध्ये पुन्हा शाब्दीक खडाजंगी

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे खासगी सिमेंट व कोळसा कंपनीच्या विरोधात तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांचे 2 ऑगस्टपासून आमरण उपोषण केले होते. चार दिवसानंतर 288 तरुणांना रोजगार, अकुशल कामगारांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणार इत्यादी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र अद्याप एकाही तरुणांना नोकरी तर दिली गेली नाही. उलट गरजू बेरोजगार तरुणांऐवजी नेते मंडळी दुस-याच व्यक्तींचे नावे नोकरीसाठी समोर करतायेत, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. याबाबत तहसीलदार यांना निवेदन देऊन तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर नोकरीवर स्थानिकांना न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. दरम्यान तहसीलदार यांच्या कॅबिनमध्ये आंदोलक आणि आमदार यांच्यामध्ये शाब्दीक खडाजंगी झाली.

Podar School 2025

मुकुटबन येथील खासगी सिमेंट कंपनी व कोळसा खाणीत स्थानिक बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यासाठी स्थानिक तरुणांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. अखेर कंपनीने ऑगस्ट महिन्यात 20 स्थानिकांना, सप्टेंबर महिन्यात 10 स्थानिकांना व ऑक्टोबर महिन्यात 10 स्थानिकांनी असे 40 तरुणांना नोकरीत सामावून घेणार तर इतर 248 बेरोजगारांना जागा निघताच रोजगार दिला जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

उपोषण सुटून पंधरवाडा उलटल्यानंतरही बीएस इस्पात कोळसा कंपनीकडून एकही तरुणांना रोजगार दिली नाही. तसेच कंपनी एका लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली येऊन गरजू आणि प्रकल्पग्रस्त असलेल्या बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याऐवजी त्याचे कार्यकर्ते व त्यांचे नातेवाईक यांची नावे नोकरीसाठी पाठवून फसवणूक करीत असल्याचा आरोप स्थानिक बेरोजगार करीत आहे. अखेर सुशिक्षित बेरोजगार व प्रकल्पग्रस्त तरुण युवक तहसील कार्यालयात धडकले व त्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन इस्पात कंपनीने दिलेले आश्वासन पूर्ण करावे अन्यथा आत्मदहन करणार असा इशारा दिला.

मुकुटबन, अर्धवन आणि भेंडाळा या ग्रामपंचायतीने कंपनीला काही व्यक्तीसाठी परस्पर शिफारस पत्र पाठवले. यासाठी एका लोकप्रतिनिधीने दबाव टाकला आहे असा आंदोलकांचा आरोप आहे. आंदोलन आम्ही केले आणि नोकरीसाठी शिफारस दुस-यांची का असा प्रश्न आंदोलकांनी तहसीलदार यांच्या कॅबिनमध्ये आमदार बोदकुरवार व तहसीलदार यांना विचारला. मात्र याबाबत त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाले नाही. दरम्यान बेरोजगार तरुण व आमदार यांच्यात यावेळी शाब्दीक खडाजंगी झाली. तरुणांनी आमदार यांना तुमचे कार्यकर्ते तुम्हाला नोकरी कशी लागते आम्ही पाहतो, असे धमकवीत असल्याचा आरोप केला आहे. उपोषण मंडपातही आमदार आणि बेरोजगार तरुणांमध्येन नोकरीच्या मुद्यावरून शाब्दीक खडाजंगी झाली होती. त्यावेळी आमदार कंपनीची भलामण करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता.  

निवेदन देते वेळी आझाद उदकवार, सुनिल जिनावार, अनुप ढगडी, पंढरी धांडे, उमेश पोतराज, श्रीकात पेटकर, जयंत उदकवार, अभय मेश्राम, अंकुश लेनगुळे, प्रतिक गेडाम, गौरव मेश्राम, गणेश उदकवार, कालिदास अरके, शुभम जींनावार, अविभारा सिन्नमवार, नीलेश जाभुळकर, मारोती तुरणकर, नीलेश बेलेकर, रितेश गावडे, बांधूरकर, गजानन वासाडे व अक्षय झाडे इत्यादी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.