बाहुबली ‘प्रभास’ प्रेक्षकांच्या भेटीला, राधे श्याम वणीत रिलिज

बाहुबलीनंतर प्रभास रोमॅन्टीक भूमिकेत... बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

पुरुषोत्तम नवघरे, वणी: बाहुबली फेम दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याचा ‘राधे श्याम’ या सिनेमाची त्याचे चाहते आतुरतेने वाट बघत होते. कोरोनाच्या तिस-या लाटेमुळे लेट झालेला राधे श्याम अखेर रिलिज झाला आहे. वणीतील सुजाता थिएटर येथे फुल्ली एसी व लक्झरीयस वातावरणात प्रेक्षकांना हा सिनेमा बघता येणार आहे. या सिनेमात प्रभाससोबत पूजा हेगडे काम करीत आहे. बाहुबली 2 नंतर ब-याच कालावधीनंतर प्रभास येत असल्याने त्याचे काम बघण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. हा एक रोमॅन्टीक ड्रामा असून यातील अॅक्शन सिनचेही चांगलेच कौतुक होत आहे.

काय आहे सिनेमाची थोडक्यात स्टोरी?
या सिनेमात प्रभास एका ज्योतिष्याच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. त्याच्याजवळ काही अद्भूत शक्ती असते ज्यामुळे त्याच्या आयुष्यात काही उतार चढाव येतात. प्रेम आणि नशिब यात तो अडकतो. पुढे प्रभासचे काय होते यासाठी आपल्याला हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघावा लागणार आहे.

चित्रपटाची पहिली घोषणा झाल्यापासून चाहते प्रभास आणि पूजाचा रोमांस पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘राधे-श्याम’ हा चित्रपट राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित बहुभाषिक चित्रपट आहे. गुलशन कुमार आणि टी-सीरिज याचे सादरीकरण करणार आहेत. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. सुजाता थिएटरमध्ये दु. 12.15, दु. 3.15 व संध्याकाळी 6.15 च्या शो मध्ये या सिनेमाचा आनंद वणीकरांना घेता येणार आहे. 

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.