महिला काँग्रेसतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

जितेंद्र कोठारी, वणी: स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या देशातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी शहर महिला काँग्रेसतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. गुरुवार 10 मार्च रोजी गणेशपूर येथे तेजराज बोढे यांच्या घरी आयोजित कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महिला कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. यावेळी तालुका काँग्रेस महिलाध्यक्ष संध्या बोबडे, शहर अध्यक्ष ज्योती सुर ,वंदना आवारी, वंदना धगडी, विजया आगबत्तलवार, सविता ठेपाले, मंदा बांगरे, संगिता खाडे, कविता चटकी, सुनिता बोढे, निशा उज्वलकर, उज्वला दोडके, मैथीली बोढे उपस्थित होत्या.

Comments are closed.