नवनूतन गणेश मंडळातर्फे भक्तांना दहा दिवस महाप्रसाद

मुकुटबनच्या बरशेट्टीवार परिवाराची ३५ वर्षांपासूनची परंपरा

0

सुशील ओझा, झरी: मुकूटबन हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखलं जातं. येथील बरशेट्टीवार कुटुंबीयांनी गेल्या ३५ वर्षांपासून गणेश मंडळाची स्थापना करून अन्नधान्याचं दान करत आहे. गणेश मंडळामध्ये १० दिवस रोज सकाळी महाप्रसाद म्हणून वेगवेगळे पकवान बनवून गणेशभक्तांसह ग्रामवासीयांना खायला मिळत आहे.

तालुक्यात १०० गणेशमंडळाच्या वर सार्वजनिक गणपतीची स्थापना केली जाते. मुकूटबन येथील बरशेट्टीवार कुटुंबांनी स्थापन केलेले गणपती स्थापन करून वेगळे स्थान प्राप्त केले आहे. गणपती स्थापनेपासून तर गणपती विसर्जन होत पर्यंत गणपतीची संपूर्ण देखभाल हा परिवार करतो.

आरती, अर्चना, पूजा व अन्नदान महाप्रसादाचा संपूर्ण खर्च अध्यक्ष भालचंद्र बरशेट्टीवार करतात. त्यांचा गणेशजीवर मोठा विश्वास असल्यामुळे दरवर्षी गणेश स्थापना करीत असतात. मंडळातर्फे महाप्रसाद घेण्याकरिता परिसरातील शेकडो लोक येतात. विसर्जनाकरिता बरशेट्टीवार कुटुंबासह समाज व गावकरी एकत्र राहून मोठा गाजावाजा करीत विसर्जन केला जातो. विसर्जनाकरिता व पाहण्याकरिता तालुक्यातील हजारो लोक येत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.