मारेगाव येथे आशा सेविका, डॉक्टर व नगरसेविकांचा सत्कार

महिलांनी स्वावलंबी बनणे काळाची गरज - किरण देरकर

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव येथे डॉक्टर, आशा सेविका व नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. एकविरा महिला पतसंस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याबाबत मार्गदर्शन केले.

राजामाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने मारेगाव येथे स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पतसंस्थेच्या अध्यक्षा किरण देरकर यांच्यासह मारेगाव येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना देठे, डॉ. संगिता थोरात, माजी नगराध्यक्ष इंदू किन्हेकार, डॉ. सपना कलोदे, वृषाली खानझोडे, कविता सोयाम तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिलांनो स्वावलंबी बना – किरण देरकर
जानेवारी हा महिना मातृसत्ताक मानला जातो. अनेक महिला कर्तबगार महिला तसेच महिलांचे सण या महिन्यात असतात. तसेच हा महिना वर्षाची एक नवीन सुरुवातही असते. कोरोना काळात आशा सेविका, डॉक्टर यांनी महिला कोणत्याही बिकट काळात मागे नसते हे दाखवून दिले. मात्र अनेक महिला अद्यापही चूल आणि मुल यातच गुंतून राहतात. कुटुंब सांभाळून आता महिलांनी आर्थिक स्वावलंबी बनणे ही काळाची गरज आहे.
– किरण देरकर, अध्यक्ष एकविरा पतसंस्था

कार्यक्रमाचे संचालन जिजा विरारकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार विद्या मत्ते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुलभा लव्हाळे, माधुरी नगराळे, सुरेखा भेले, मंगला आसेकर, रंजना येरगुडे, अपर्णा घागी व एकविरा पतसंस्थेच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

भरधाव कारची रोहीला धडक, रोही जागीच ठार

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.