पटवारी कॉलनी येथे झाली घरफोडी

सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवरही मारला चोरट्याने डल्ला

0

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 23 नोव्हेंबरच्या रात्री लालगुडा येथील पटवारी कॉलनीत घरफोडी झाली. यात चोरट्याने घराचे कुलूप तोडून 29,700 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. घरमालकाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध वणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Podar School 2025

फिर्यादी दिलीप सदाशिव खंडाळकर (31) हे खाती चौकात राहत होते. 20 दिवसांपूर्वी ते आपल्या पटवारी कॉलनीतील दीनानाथ नगर येथे नव्याने बांधलेल्या घरात राहण्यास आले. सोमवार 23 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता ते आपल्या पत्नीला माहेरी सोडण्यास नागपूर येथे गेले होते. मंगळवारी 24 नोव्हेबरला पत्नीला माहेरी सोडून ते सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वणीत आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आपल्या खाती चौकातील जुन्या घरून दुचाकी घेऊन ते पटवारी कॉलनीतील घरी आले. बघितले असता घराचे कुलूप तुटलेले होते. घरात जाऊन बघितले असता आलमारीचे लॉकर तोडलेले होते. तेथून सोन्याची आभूषणे व नगदी असा एकूण 29 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याचे लक्षात आले.

दिलीप यांनी 25 नोव्हेंबररोजी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 457, 380नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास विठ्ठल बुर्रेवार करीत आहे.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

 

Leave A Reply

Your email address will not be published.