सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्यापही ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे गंभीर रुग्णांना वणी चंद्रपूर व यवतमाळ सारख्या ठिकाणी धावपळ करावी लागत होती. अखेर माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ मुकुटबन येथे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून दिले. याबाबत सामजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.
कोरोनाच्या तिस-या लाटेबाबत बोलले जात आहे. दुस-या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना हाल सोसावे लागले. मुकुटबन ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व गाव म्हणून ओळखले जाते. मात्र तिथे अद्यापही पुरेशा आरोग्य सेवा सुविधा नाही. तिस-या लाटेचा धोका ओळखून खबरदारी म्हणून मंगेश पाचभाई यांनी फोन करून सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्संट्रेटरी मागणी केली होती. मुनगंटीवार यांनी तातडीने ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून दिले.
तसेच पुढील संभाव्य कोरोना रुग्णासाठी व इतर रुग्णासाठी ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर एक दिलासादायक ठरले आहे. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ पंडित, दत्ता लालसरे, गणेश पेटकर, राहुल ठाकूर, सुधीर पाचभाई, जगदीश चांदेकर तसेच गट प्रवर्तक नगराळे, मुकुटबन येथील आशा सेविका व कर्मचारी उपस्थित होते.
हे देखील वाचा:
शिबला परिसरात आढळलेल्या जिवाष्मे आणि अष्म खांबांचे संवर्धन व्हावे