हिरापूर गावाचा प्रभार मांगलीच्या पोलीस पाटलांकडे द्या
निवेदन देऊनही अद्याप कारवाई न झाल्याने गावक-यांना नाहक त्रास
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील हिरापूर येथील पोलीस पाटील यांचे पद रिक्त असल्यामुळे ग्रामवासियांसमोर अडचण निर्माण होत आहे. रहिवासी दाखला मिळणे, निराधार लोकांच्या समस्येबाबत मोठी अडचण होत आहे. ग्रामपंचायत व इतर कार्यलाईन कागदपत्रे जुळवाजुळ झाल्यानंतर पोलीस पाटलाच्या दाखल्याकरिता शासकीय कामे करण्यास अडचण निर्माण होत आहे. याआधी याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे याबाबत मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हिरापूर येथील पोलीस पाटील पद रिक्त झाल्याने नवीन पोलीस पाटीलची नियुक्ती होत पर्यंत हिरापूर ग्रामवासीयांना दाखले व इतर अडचण निर्माण होऊ नये याकरिता मांगली येथील पोलीस पाटील नामदेव सातघरे यांच्याकडे प्रभार देऊन जनतेची अडचण दूर करावी अशी मागणी ग्रामवासीयांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र त्यावर अद्याप कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन यावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी सरपंच अशोक पाईलवार, उपसरपंच लक्ष्मी गोडे, गजानन वरगणे, श्रीनिवास पाईलवार, प्रेमराज बाराहाते, संजय गोडे, भास्कर गडामोडे, संतोष पाईलवार, दिलीप गोपतवार, सुनील मलगेवार, चंपत चौधरी, अशोक आसरवार, सोपान पाईलवार, सुनील गोपतवार, लोकेश चौधरी, गणेश टेकाम व ग्रामवासीयांनी केली आहे.
हे देखील वाचा: