…आणि चोरटा कैद झाला सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

सालगड्याच्या घरातील सोने चोरट्याने केले लंपास

भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये सालगड्याचे काम करणाऱ्या सालगड्याचे शेतातील बंड्यामध्ये असलेले सोने एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. ही घटना मार्डी शिवारातील असून शनिवारी ही  घटना घडली. मात्र सदर चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहे.

चोपण येथील डॉ. राहुल ठाकरे यांचा वणी येथे दवाखाना आहे. त्यांची मार्डी शिवारामध्ये शेती आहेत. या शेतातील बंड्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील देविदास महादेव जवादे हे आपल्या पत्नी व मुलांसोबत राहतात. ते शेतात सालगडी म्हणून काम बघतात.

शनिवारी दि. 27 नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे जवादे कुटुंब शेतामध्ये कामावर गेले होते. 5 वाजताच्या दरम्यान ते आपल्या बंड्यावर परत आले असता त्यांना काही सामान त्यांना पलंगावर बॅगमधील कागदपत्रे पसरलेले दिसले. तसेच घरचे सोने त्यांना दिसले नाही. त्यांनी मालकाला याची माहिती दिली.

लगेच मालक येऊन त्यांनी बंड्यावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना 3 वाजून 18 मिनिटांनी एक अज्ञात व्यक्ती, सावळ्या रंगाची, वय अंदाजे 30 ते 35 च्या दरम्यान असलेली एक बॅग घेऊन जाताना दिसली. सदर चोरटा हा मोटारसायकलवरून आला होता. या प्रकरणी चोरट्याने सुमारे 15 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे.

जवादे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी कलम 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या नेतृत्वाखाली जमादार सुरेंद्र टोंगे व पोलीस कॉन्स्टेबल विनेश राठोड करीत आहे. सदर संशयीत कुणाला आढळल्यास याबाबत माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

पाहिजेत… साईट सुपरवायझर व ऑफिस बॉय

मॅकरून स्टुडन्ट्स अकॅडमीत संविधान दिन उत्साहात साजरा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.