एका कारवाईतून मिळाले दुस-या कारवाईचे धागेदारे, उघड झाली मोठी तस्करी

गोवंश तस्करांच्या आवळल्या मुसक्या, 15 जनावरांची सुटका

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांची शुक्रवारी 16 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास सुटका करण्यात आली. या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय तस्करी करण्यात येणा-या 15 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. सदर कारवाई डीबी पथकाद्वारे करण्यात आली. विशेष म्हणजे एक कारवाई केली त्यातून दुस-या कारवाईचे धागेदोरे मिळाले व त्यातून तिस-या कारवाईचे.

Podar School 2025

शुक्रवारी रात्री पोलिसांनी खबर मिळाली की, वणीतील खडबडा येथून मोमीनपुरा येथे जनावरांची तस्करी होणार आहे. वणीतील डीबी पथकाने तलाव रोडवर सापळा रचला. दरम्यान रात्री एक छोटा हत्ती (MH 29 BE 1427) येताना दिसले. पोलिसांनी तपासणी केली असता यामध्ये एक म्हैस व दोन गोवंश आढळून आले. गाडीच्या चालकाला विचारणा केली असता त्याने सदर जनावर हे खडबडा येथून आणले असल्याची माहिती दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या टीपवरून डीबी पथकाने तात्काळ खडबडा येथे सय्यद रहेमान सय्यद कादर (45) यांच्याकडे ठिकाण्यावर धाड टाकली. तिथे पोलिसांना 4 गोवंश आढळून आले. आरोपी सय्यद कडून आणखी माहिती घेतली शेख वकील शेख रसूल याचाही संदर्भ मिळाला. पोलिसांनी तिथेही धाड टाकली असता त्याच्याकडे 8 गोवंश आढळून आले.

या प्रकरणी पोलिसांनी 14 गोवंश व 1 म्हैस अशा एकूण 15 जनावरांची सुटका केली. सदर गोवंशाची परिस्थिती अतिशय दयनिय होती. त्यांना खाण्यासाठी चा-यापाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. या जनावरांना निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आले होते.

सदर कारवाईत 2 लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एैतियाज खान इस्माईल खान (23) रा. खडबडा, सैय्यद रहेमान सैय्यद कादर (45) रा. खडबडा, शेख वकील शेख रसूल (50) रा. खडबडा, एजाज कुरेशी रा. मोमीनपुरा, अनिस कुरेशी रा. मोमीनपुरा, मो. इस्तेयाक अब्दुल वहाब कुरेशी रा. रजा नगर यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976, कलम 5 (अ) (ब), कलम 9, 9 (अ), प्राण्यांचा छळ अधिनियम 1960 कलम 11 (1) (A) (B) (E) (F)(H) (I) (K) सह मोवाका क 130 (3)/ 177 नुसार गुन्हा नोंद केला आहे. कारवाईचे सापडलेल्या जनावरांना तालुक्यातील रासा येथील गुरुमाऊली गोरक्षण येथे पाठविण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.