शिंदोला माईन्स येथे ग्रामपंचायत सदस्याला दगडाने मारहाण

ग्रामपंचायतीची मिटिंग संपून परतत असताना हल्ला

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: ग्रामपंचायतीच्या मिटिंगवरून परतत असताना ग्रामपंचायत सदस्याला एका महिनेने मारहाण करत दगडाने हल्ला केला. शिंदोला माईन्स, हनुमान नगर येथे ही घटना घडली. पीडितेचे नाव ज्योती रमेश बोधाने असून या मारहाणीत त्या जखमी झाल्या आहेत. मारहाण करणा-या आरोपीचे नाव रेखा वसंत उईके (50) असून त्यांच्या विरोधात शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेला दोन पक्षातील राजकीय वादाची किनार असल्याची चर्चा सुरू आहे.

तक्रारीनुसार, ज्योती रमेश बोधाने (45) या शिंदोला माईन्स हनुमान नगर येथील रहिवाशी आहेत. त्या ग्रामपंचायत येनक अंतर्गत गटग्रामपंचायत हनुमान नगरच्या सदस्य आहेत. दिनांक 30 जून रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास त्या त्यांचा मुलगा आकाश याच्यासोबत येनक येथे ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीसाठी गेल्या होत्या. मिटिंग संपल्यावर त्या त्यांच्या मुलासोबत दुचाकीवर बसून हनुमाननगर येथे घरी परतत होत्या. येनक पासून सुमारे 1 किलोमीटरचे हे अंतर आहे.

दुपारी 11.30 वाजताच्या सुमारास ज्योती या आपल्या मुलासह दुचाकीवरून शिंदोला माईन्स येथील गेटजवळ पोहोचल्या. दरम्यान त्यांना गावातीलच रहिवाशी असलेल्या रेखा वसंत उईके (50) हिने हात दाखवून त्यांची दुचाकी थांबवली. ज्योती यांचा मुलगा आकाश याने गाडी रस्त्याच्या कडेला लावली. दरम्यान रेखाने आकाशला तिला शिविगाळ का करतो अशी विचारणा केली. तेव्हा ज्योती यांनी कधी शिविगाळ केली याबाबत विचारणा केली. त्यावर रेखा यांनी ज्योती यांच्यासोबत तिथे वाद घातला.

रेखा हिने चिडून ज्योती यांचे केस ओढले व रस्त्याच्या बाजूला असलेला दगड उचलून ज्योती यांच्या डोक्यावर मारला. या हल्याने ज्योती यांच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. रेखा हीने ज्योती यांना शिविगाळ केली व धमकी देत तिथून निघून गेली. त्यानंतर ज्योती यांनी त्यांच्या मुलासह शिरपूर पोलीस स्टेशन गाठले व आरोपी रेखा वसंत उईके (50) हिच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी रेखा विरोधात भादंविच्या कलम 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल संतराम अक्कलवार करीत आहे. 

मारहाणीला राजकीय किनार ?
आरोपी रेखा या गटग्रामपंचायत हनुमाननगरच्या सदस्य असलेल्या ज्योती उईके यांची आई आहे. ग्रामपंचायती अंतर्गत येणा-या बंधा-याच्या बांधकामावरून सत्ताधारी व विरोधी पक्ष आमने सामने आले आहे. याची या प्रकरणाला किनार असल्याची कुजबुज सध्या सुरू आहे.  

हे देखील वाचा:

शिबल्याजवळ रस्ता रुंदीकरणाच्या कामात सापडले कोरीव दगडी खांब

सालगड्याची पत्नी घरी एकटी असताना मालकाने केला विनयभंग

साहित्य संघाच्या अध्यक्षपदी दिलीप अलोणे तर सचिवपदी अभिजीत अणे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.