ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांना लागले ठेकेदारीचे वेड

ग्रामविकासाच्या नावाखाली ठेकेदारीतून पैसा कमविण्याच्या धंदा सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यात 55 ग्रामपंचायत व एक नगरपंचायत असून शेकडो पुरुष महिला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच ,उपसरपंच व सदस्य म्हणून पदावर आहे. 80 टक्के ग्रामपंचायत वर महिलाराज असून बहुतांश सरपंचाचे पतीदेवच स्वतःला सरपंच म्हणून वावरत असून ग्रामपंचायतचा कारभार सुद्धा पाहत आहे. या पतीराजमुळे महिला सक्षमीकरणला खीळ लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.महिला सरपंचाचे पती सरपंच आहेच परंतु सदस्य सुद्धा त्यापेक्षा वरचढ झाले आहे.

तालुक्यातील अनेक महिला सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचे पती शासकीय ,निमशासकीय,सोसायटी, संस्थेवर नौकरिवर आहे तर काही जिल्हा परिषद शिक्षक सुद्धा आहे. हे कर्मचारी ग्रामपंचायतच्या अनेक कामात मोबाईल द्वारे व बाहेर मिटिंग घेऊन ढवळाढवळ करतांना दिसत आहे. तसेच ग्रामवासीयांच्या तक्रारींवर स्वतःच मोबाईलवरून संभाषण करून सोडविण्याचे बोलतात. नियमाने शासकीय कर्मचारी याना राजकारणात सहभाग घेता येत नसतांना छुप्या मार्गाने असे प्रकार तालुक्यात मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक गावात दोन तीन पॅनल लढतांना दिसतात तर अपक्ष उमेदवारही असतात. व निवडणुकी दरम्यान लाखो रूपये खर्च करून निवडून येतात. नुवडून येताच निवडनिकीत लागलेला खर्च काढायचा कसा याचे विचार सुरू होऊन गावातील होणारे सर्व कामाची ठेकेदारी स्वतःच करून पैसा लाटण्याचा निर्णय घेतला जातो. असे प्रकर सुरु झाले आहे. नियम धाब्यावर बसऊन टेंडर म्यानेज करणे,जवळील नातेवाईक ,भाऊ किंवा स्वतः कामे घेऊन पैसा कमविण्याच्या गोरखधंदा सुरू झाला आहे.

ग्रामविकास करिता खासदार,आमदार,जिल्हा परिषद ,पंचायत समिती व इतर विभागातर्फे तसेच विविध योजनेअंतर्गत लाखो रुपये रस्ते,वीज,पाणी व गावातील विविध विकास कामाकरिता निधी मिळतो. ग्रामपंचायत पातळीवर विकासकामे करण्याकरिता ठराव घेऊन मंजुरात घ्यावे लागते.तसेच मंजूर कामाचे इस्टीमेट तयार करावे लागते, 15 लाखाच्या वरील कामाचे ई टेंडरिंग करावे लागते. तर काही कामे ग्रामसभेत मंजूर करून घ्यावे लागते.

परंतु असे नियमाचे पालन बहुतांश ग्रामपंचायत होतांना दिसत नाही मिटिंग व ग्रामसभेचे स्वाक्षऱ्या घरी जाऊन घेतल्या जाते व मिटिंगचा कोरम पूर्ण झाल्याचे दाखविल्या जाते अशी ओरड ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी करीत असल्याचे ऐकला मिळत आहे.. व स्वतःला ते काम कसे मिळेल याकरिता सचिव यांना पकडून धावपळ करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

राजकारण करून ग्रामविकास ऐवजी स्वतःचा विकास करण्याचे प्रयत्न अनेक सरपंच उपसरपंच व सदस्य करण्याच्या तयारीत दिसत आहे. काही ग्रामपंचायत मध्ये तर लोकप्रतिनिधीना पकडून पंचायत समिती ,सचिव पातळीवर दबाव टाकून ठेकेदारी करून पैसा कमविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अश्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांमुळे खरच गावाचा विकास होणार का ? असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहे.

हे देखील वाचा:

नवीन लालगुडा येथे 17 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

ब्राह्मणी रोडवर खड्यात दुचाकी आदळून अपघात

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.