झरी तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वाजले बिगूल

सरपंचपदाचे आरक्षण रद्द होताच "कही खुशी कही गम " ची परीस्थिती

0

सुशील ओझा,झरी: माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२०पर्यंत मुदत संपलेल्या तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे बिगुल वाजलेत. झरी तालुक्यात यातील ४१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबरला अचानक जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात तारांबळ उडाली. तर सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने “कही खुशी कही गम ची परिस्थिती निर्माण झाली आहे.

ऐन थंडीच्या दिवसांत ग्रामीण भागातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. परंतु निवडणूक आयोगाने आधीच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केल्याने, ग्रामीण भागांतील सरपंचपदासाठी इच्छुकांचा हिरमोड झाली होती.

परंतु सरपंचपदाचे आरक्षण तीन दिवसांपूर्वी रद्द करण्यात आल्याने राजकीय पातळीवर समाधान व्यक्त होत आहे. तर अनेकांना मोठा झटकासुद्धा लागला आहे. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर ग्रामपंचायत सदस्यांकरिता योग्य उमेदवार शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. निश्चित झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची जुळवाजुळवदेखील सुरू झाली आहे.

एप्रिल ते डिसेंबर २०२०पर्यंत तालुक्यातील मुदत संपलेल्या वेडद, पिंप्रड,हिरापुर,अर्धवन,खातेरा
पांढरकवडा(ल), मुकुटबन, सिंधीवाढोणा, चिचघाट, बोपापूर, दरा, गवारा, पिवरडोल, दाभाडी, माडवी, चिखलडोह, सुर्ला, मागुर्ला बु, सुसरी,

मांगली, भेंडाळा, मार्की(बु), राजूर गो., येडशी, कोसारा, अडेगाव, खडकी, मुळगव्हाण, मांडवा, निबादेवी, पांढरवाणी, लिंगटी, पाटण, दिग्रस, कमळवेल्ली, अहेरअल्ली, सुर्दापूर, धानोरा, झामकोला, वाढोणाबंदी, येदलापूर या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.

आयोगाच्या माहितीनुसार १५ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार २३ ते ३० डिसेंबर २०२०पर्यंत नामनिर्देशन पत्र भरणे, २५, २६ व २७ डिसेंबर सुटीचे दिवस सोडून), ३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी, ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेणे, ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेनंतर अंतिम यादी प्रसिद्ध करणे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७:३० ते ५:३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे.तर १८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार आहे.

हेदेखील वाचा

जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना यवतमाळ येथून अटक

हेदेखील वाचा

आज तालुक्यात 5 पॉजिटिव्ह

Leave A Reply

Your email address will not be published.