आज तालुक्यात 5 पॉजिटिव्ह

नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन

0

जब्बार चीनी, वणी: बुधवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळलेत. यातील विठ्ठलवाडी 2, मनीषनगर 1, व्दारका अपार्टमेन्ट 1 आणि गणेशपूर 1 येथील आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

बुधवारी यवतमाळ येथून 34 रिपोर्ट आलेत. यात 2 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत व 32 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 17 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. आज आलेल्या रुग्णांवरून 95 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 129 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 62 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 1054 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 969 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. बुधवारी 2 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली. सध्या तालुक्यात 62 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 30 जण होम आयसोलेट आहेत. 15 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये तर 17 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंतची तालुक्यातली मृत्यूसंख्या 23 आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सावधगिरी बाळगणे तेवढेच महत्त्वाचे
गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. याशिवाय शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्यात हा आकडा 20 च्या खाली आला होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. सध्या कोरोनाची भीती गेल्याने अनेकांनी सावधगिरी बाळगणे कमी केले आहे. त्यामुळेही रुग्ण वाढण्यास मदत होत आहे.

हेदेखील वाचा

येदलापूरच्या निकृष्ट वॉलकंपाउंडची अधिकाऱ्यांनी केली पाहणी

हेदेखील वाचा

 सुरदापूर येथील जप्त रेतीचोरी प्रकरणात दोघांना अटक 

Leave A Reply

Your email address will not be published.