जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना यवतमाळ येथून अटक

पळसोनी फाट्याजवळ 13 डिसेंबरला हल्ला करून केली होती कारची तोडफोड

0

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ येथील कापड व्यावसायिकाच्या कारची तोडफोड करुन रॉडने मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना वणी पोलिसांनी मंगळवारी यवतमाळ येथून अटक केली. विजय तुकाराम दुमारे (39) रा. भाग्यनगर, यवतमाळ, आशीष दीपक मेश्राम (24) रा. डोर्ली ता. यवतमाळ व संतोष उर्फ भुऱ्या अर्जुन पुरी (26) रा. संदीप टॉकीजजवळ, यवतमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार यवतमाळ येथील कापड व्यावसायिक गुरुमुख मनोहरलाल कोटवानी हे 13 डिसेंबर रोजी यवतमाळ येथून कामानिमित्त कारने वणीला येण्यासाठी निघाले. वणी येथून काही किमी अंतरावर पळसोनी फाट्याजवळ त्यांच्या वाहनाला एका दुसऱ्या कारने ओव्हरटेक करून त्यांची कार अडविली. त्या कारमधील तीन लोकांनी गुरुमुख कोटवानी यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केले. तसेच कोटवानी यांच्या कारची तोडफोड करीत गाडी पलटी केली व तिथून पळून गेले.

घडलेल्या घटनेबाबत गुरुमुख मनोहरलाल कोटवानी (30 वर्ष) रा. यवतमाळ यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीच्या अनुषंगाने वणी वणीचे ठाणेदार पो.नि. वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात डी. बी. पथकातील पो.उ.प.नि. गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर, रत्नपाल मोहाडे, दीपक वाडर्सकर यांनी

बुधवार 16 डिसें. रोजी यवतमाळहून वरील तिन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेला लोखंडी रॉड तसेच इंडिगो कार क्र. (एम.पी.09 सी.एम.2284) व महिंद्रा झायलो यूएसव्ही क्र.(एम.एच.14 सी.आर.3003) आरोपींकडून जप्त केली.

आरोपींविरुद्ध कलम 294, 323, 324, 342, 427, 506 अनव्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. अटकेतील सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास ए एस आई डोमाजी भादीकार व संजय शेंद्रे करीत आहे.

हेदेखील वाचा

आज तालुक्यात 5 पॉजिटिव्ह

हेदेखील वाचा

स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Leave A Reply

Your email address will not be published.