झरी पंचायत समितीत ‘आमचं गाव, आमचा विकास’ कार्यक्रम पार

दोन दिवशीय शिबिरात गावाचा विकास आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन

0

सुशील ओझा, झरी: झरी येथील पंचायत समितीमध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत ‘आमचं गाव, आमचा विकास’ कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्त सोमवार व मंगळवार या दोन दिवशी कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा जिल्हा परिषद, पंचायत विभाग यवतमाळ व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. यात गावाचा विकास आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाला जि. प. अतीरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी ठमके यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

Podar School 2025

शिबिरात यशदा पुणेचे राज्यस्तरीय प्रशिक्षक देवीदास ढगे, लीना तुरकर, गट विकास अधिकारी सुधाकर जाधव, विस्तार अधिकारी इसलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. गावाला 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत प्राप्त निधीमधून 50% बंधित निधी व 50% अबन्धीत निधी प्राप्त झाला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सदर निधीतून संपूर्ण गाव हगंदारीमुक्त करणे, गावाचा दर्जा राखणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, 100% पाणी पुरवठा करणे, सन 2021 पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणी पुरवठा करणे, वॉटर हार्वेस्टिंग, पाणी संकलन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मानव विकास निर्देशांक अंतर्गत आरोग्य, शिक्षण, उपजीविका 25%, महिला व बालकल्याण मध्ये 10%, प्रशासकीय खर्च व आपले सेवा केंद्रा अंतर्गत 10%, दिव्यांगाकरीता 5%, तसेच कृषी, पशुसवर्धंन, वन, समाज कल्याण, शिक्षण, इमारत, दळणवळण, पाटबंधारे, पिण्याचे पाणी, उद्योग धंदे, कुटिर उद्योग, सहकार, स्व संरक्षण व ग्रामराखण, सामान्य प्रशासन, इत्यादी कामे करण्यात येणार आहे.

शिबिरात शास्वत विकास SDG मध्ये गरिबी नष्ट करणे किंवा संपवणे, उपासमारी नष्ट करणे, भुकमरी संपवणे, सर्व वयोगटातील लोकांकरिता आरोग्याची सुविधा देणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण, लैंगिक समानता, सर्वांकरिता पाणी व स्वच्छता, शास्वत व्यवस्थापन, आधुनिक उर्जा, पूर्ण वेळ रोजगार, प्रतिष्ठापूर्वक काम, औद्योगिकरणाला चालना देणे इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

हे देखील वाचा:

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.