वणीत गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

0 456
विवेक तोटेवार, वणी; वणीत दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमा उत्सवात महत्त्वपूर्ण आकर्षण म्हणजे साई बाबाची मिरवणूक असते. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता सदर मिरवणूक साई बाबा मंदिर यवतमाळ रोड येथून काढण्यात आली. संपूर्ण शहरातून विविध भागातून मार्गक्रमण करीत मिरवणूकीचा टिळक चौकात समारोप करण्यात आला.
मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. मिरवणुकीमध्ये असलेली पालखी हे यातील प्रमुख आकर्षण होतं. टिळक चौक, शिवाजी चौक, खाती चौक, गांधी चौक, गाडगे बाबा चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक असा मार्गक्रमण करीत सदर मिरवणुकीची सांगता टिळक चौकात झाली. दरम्यान वणी शहरातील प्रत्येक चौकात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

मिरवणुकीत महिला, पुरुष, युवक, वयोवृद्ध सर्व मोठया संख्येने उपस्थित होते. डी जे च्या तालावर नवयुवक थिरकत होते. मिरवणुकीत साई पालखी, साई बाबांची मूर्ती, पंजाबी बँड, कव्वाली चमू, फटाक्यांची अतिषबाजी प्रमुख आकर्षण होते. वणीत गेल्या अनेक वर्षांपासून साई सेवा समिती गुरुपौर्णिमा मिरवणुकीचे आयोजन करीत आहे. काही सामाजिक संघटनाही यात सहभागी होतात. तसेच प्रत्येक भाविक यात सहभागी होतो.

संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडली. यात वणी पोलिसांनी महत्वपूर्ण भूमीका बजावली. प्रत्येक चौकात व मिरवणूक जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Comments
Loading...