चिखलगाव येथील तो जीवघेणा खड्डा बुजवला

अखेर प्रशासनाला आली जाग

0

जब्बार चीनी, वणी: चिखलगाव येथील यवतमाळ रोडवर असलेल्या खड्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने सोमवारी वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाला जाग आली. आज त्या रस्त्यातील खड्डा बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली. याबाबत युवक काँग्रेसचे अशोक नागभी़डकर व प्रदीप खेकारे यांनी निवेदन देत आक्रमक भूमिका घेतली होती.

लालपुलीया परिसर हा अपघातासाठी सर्वात संवेदनशील परिसर मानला जातो. अनेक अपघात इथे घडलेले आहे. त्यातच या रस्त्यावर एका खड्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. रोज हजारो लोक या रस्त्यावरून प्रवास करतात. पावसाळ्यामुळे या खड्यात पाणी साचले होते. त्यामुळे हा खड्डा जास्तच धोकादायक झाला होता. 

या खड्यामुळे अनेक किरकोळ अपघात झाले होते. निरपराध व्यक्तीचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल प्रदीप खेकारे यांनी उपस्थित केला होता. अखेर आज हा खड्डा बुजवण्यात आला. युवक काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरल्याबाबत ‘वणी बहुगुणी’चे आभार मानले.

हाच तो चिखलगाव जवळील महामार्गावरील खड्डा

हे देखील वाचा:

अखेर गोंडबुरांडा येथील तरुणाची मृत्यूशी झुंज संपली

वणीतील बँक कॉलनीतील रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत

Leave A Reply

Your email address will not be published.