पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील रांगणा, भुरकी, जुनी सावंगी, जुनाड, शेलु (खु), झोला, कोना, उकणी अशा अकरा गावात पुराने थैमान घातले होते. पुराचे पाणी ओसरले आहे. गावकरी गावात परत गेले आहेत. मात्र आता गावात रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे आजपासून पूरग्रस्त गावात मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पशू उपचार शिबिर देखील याच ठिकाणी राहणार आहे. रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी, डॉक्टर्स असोसिएशन व क्रांती युवा संघटने तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी 22 जुलै सकाळी 8 ते 11 दरम्यान शेलू खुर्द, भुरकी, रांगना येथे तर दुपारी 3 ते 7 या वेळेत झोला व कोना येथे आरोग्य शिबिर होणार आहे. तर शनिवारी दिनांक 23 जुलै रोजी 8 ते 11 दरम्यान जुनाड़ा, पिंपळगाव, उकनी येथे तर दुपारी 3 ते 7 दरम्यान नायगाव, कवडसी, सावंगी, जुनी सावंगी येथे शिबिर होणार आहे. रविवारी दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 8 ते 11 दरम्यान चिंचोली, जुगाद, तर दुपारी 3 ते 7 दरम्यान मुंगोली व शिवनी येथे शिबिर होणार आहे.
25 जुलाई 2022 रोजी मारेगाव तालुक्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते 11 वाजता सावंगी, शिवनी धोबे तर दुपारी 3 ते 7 दरम्यान आपटी, वनोजा देवी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रोगराई पसरण्याचा धोका – डॉ. महेंद्र लोढा
पूर जरी आता ओसरला असला तर यानंतरच्या काळात रोगराई पसरण्याचा मोठा धोका असतो. सध्या गावात चिखल झाले आहे. अनेक छोटे मोठे प्राण्यांचा पुरामुळे जीव गेला आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गावक-यांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. तसेच पशूधनाच्या आरोग्यासाठी पशू चिकित्सक तपासणी करणार आहे.
– डॉ. महेंद्र लोढा, डॉक्टर असोसिएशन, वणी
या शिबिराचा पूरग्रस्त गावातील लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी, डॉक्टर्स असोसिएशन व क्रांती युवा संघटने तर्फे करण्यात आले आहे.
हे देखील वाचा:
पुराने घेतला शेकडो पशूधनाचा जीव, रात्रीत झाले होत्याचे नव्हते…
Comments are closed.