वणी पब्लिक स्कूलची कॉमर्स शाखेची कशिश रुपेश कोचर तालुक्यातून टॉपर… यावर्षीही वणीत मुलींचीच बाजी
एसपीएमची अलविरा कुरेशी शहरातून विज्ञान शाखेत प्रथम तर रजिया मनसूर शेख द्वितीय
निकेश जिलठे, वणी: आज बुधवारी दिनांक 8 जून रोजी 12 विचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यावर्षीही निकालात मुलींनेच बाजी मारली आहे. शहरात वणी पब्लिक स्कूलची कॉमर्स शाखेची विद्यार्थीनी कशिष रुपेश कोचर ही 89.33 टक्के गुण घेत वणी शहरातून तसेच तालुक्यातून टॉपर ठरलीये. तर एसपीएस ज्यु. कॉलेजची अलविरा इकबाल कुरेशी ही विज्ञान शाखेतून शहरात टॉपर ठरलीये. तिला 88.67 गुणे मिळाले. याच शाळेतील विज्ञान शाखेची रजिया मनसूर शेख 88.17 गुण मिळवत शहरातून द्वितीय क्रमांकावर राहिलीये. लोटी महाविद्यालयाची साक्षी प्रमोद माथनकर ही 88 टक्के गुण घेऊन कॉलेजमधून अव्वल व शहरातून तृतिय ठरलीये. लोटी महाविद्यालयाची कला शाखेची जान्हवी पद्माकर मंथनवार हीने 78.50 टक्के गुण घेत कला शाखेतून कॉलेज तसेच शहरातून प्रथम येण्याचा मान मिळवलाये.
विज्ञान शाखेचा निकाल…
लोटी महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील श्रेया अनिल पाटील ही 84.83 गुण घेत कॉलेजमध्ये द्वितीय आली आहे. तर साहील तुळशीराम गुंजेकर 83.17 टक्के गुण घेत कॉलेजमधून द्वितीय आला आहे. वणी पब्लिक स्कूलची कुमकुम उमेश झाडे हीने 82.83 टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. याच शाळेतील सेजल उमेशचंद कोचर 77.83 तर कौमुद देवेंद्र धरणे व अंकिता संदीप जुनगरी यांनी 77 टक्के गुण मिळवत शाळेतून द्वितीय व तृतिय आल्या आहेत. लॉयन्स ज्यु. कॉलेजमधला अनुप गुरय्या पेरकावर 78.67 टक्के गुण घेत कॉलेजमधून प्रथम आला आहे. तर दिया इश्वर बोढे 76.67 टक्के गुण घेत कॉलेजमधून द्वितीय आली आहे. नुसाबाई कन्या शाळेतील भूमिका सूर ही 76.50 गुण घेत शाळेतून प्रथम आली आहे.
कला शाखा निकाल…
एसपीएम शाळेतील कला शाखेतील रेवती लक्ष्मण नक्षिणे 74 ही टक्के गुण घेत शाळेत प्रथम आली आहे. लोटी महाविद्यालयातील कला शाखेतील वैष्णवी मंगल भगत ही 73.50 टक्के गुण घेत कॉलेजमधून द्वितीय आली आहे. तर वैष्णवी देवीदास काळे ही 73 टक्के गुण घेत कॉलेजमध्ये तृतिय आली आहे. वैष्णवी शंकर नागपुरे ही 72 टक्के गुण घेत व्होकेशनल शाखेतून कॉलेजमधून प्रथम आली आहे.
कॉमर्स शाखा निकाल…
वणी पब्लिक स्कूलचा उज्ज्वल सुनिल देरकर हा 87.33 टक्के गुण घेत कॉलेजमधून तसेच शहरातून द्वितिय आला आहे. याच शाळेतील हर्षल सुभाष महाकुलकर हा 87 टक्के गुण घेत कॉलेज व शहरातून कॉमर्स शाखेतून तृतिय आला आहे. लोटी महाविद्यालयातील कॉमर्स शाखेची भाग्यश्री बालाजी नागतूरे ही 79.50 टक्के गुण घेत कॉलेजमधून प्रथम आली आहे. कीर्ती राजू मिलमिले 78.33 टक्के गुण घेत द्वितीय तर अवंतिका भालचंद्र भुसारी 77.17 टक्के गुण घेत कॉलेजमधून तृतिय आली आहे.
हे देखील वाचा:
घोन्सा खाणीत दरोड्याचा प्रयत्न, वेकोलि सुरक्षा रक्षकावर हल्ला
बळीराजा कृषी केंद्राचे उद्घाटन, वाजवी दरात बि-बियाणे, खते उपलब्ध
जैन ले आउट येथील गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलसाठी प्रवेश सुरू
Comments are closed.